पुणे | चेन्नईहून डबे येताच हिंजवडी मेट्रोची चाचणी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पीएमआरडीएने हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किलोमीटर लांबीच्या इलिव्हेटेड (उन्नत मार्ग) मेट्रोचे काम गतीने सुरू आहे. या साठी चेन्नई येथे तयार करण्यात आलेले तीन डबे जूनमध्ये पुण्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर त्याची चाचणी घेतली जाणार आहे.
पीएमआरडीएची स्थापना झाल्यानंतर पहिल्या वर्षातच हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन वर्षांत मेट्रो प्रकल्पासाठीचे पिलर्स उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.
त्याबरोबरबरोबरच गर्डर टाकण्याचे काम साठ टक्के पूर्ण झाले आहे. तर विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे काम देखील वेगाने सुरू आहे. दरम्यान चेन्नई येथे या मेट्रोसाठी डब्बे तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. मागील महिन्यात तेथे तपासणी देखील पूर्ण झाली आहे.
पुणे मेट्रोला जोडणार
या मार्गावर एकूण 23 स्टेशन असतील. तर माण येथे 55 एकर जागेवर मेट्रोसाठी स्वतंत्र डेपो उभारण्यात आला आहे. आहे. माण-हिंजवडी -मेगा पोलीस- विप्रो चौक, शिवाजी चौक, वाकड उड्डाणपूल, बालेवाडी स्टेडियम- विद्यापीठ चौक, आकाशवाणी केंद्र,
शिवाजीनगर न्यायालय असा मेट्रोचा मार्ग राहणार आहे. शिवाजीनगर येथे पुणे महापालिकेच्या मेट्रो प्रकल्पास मार्ग जोडण्यात येणार आहे. प्रत्येक हजार मीटरवर मेट्रोसाठी स्टेशन उभारण्यात येणार आहे.





