हिंगोली जिल्हा: साबळेवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना चिखलातुन शोधावी लागते शाळेची वाट

– शिवशंकर निरगुडे (प्रतिनिधी)
हिंगोली : महाराष्ट्र राज्यात एकीकडे शहरी भागांमध्ये समृद्धी महामार्ग मुख्यमंत्री ग्रामसड़क योजना मातोश्री पादन रस्ता योजना अश्या अनेक योजना प्रशासनाच्या वतीने राबवत रस्त्याचे जाळे विनन्यात येत आहे. मात्र हिंगोली जिल्ह्यातील बासंबा येथून जवळ असलेल्या साबळेवाडी येथील 2 किलो मीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
या साबळेवाडीत सुमारे 15 घरे आहेत आणि सुमारे अंदाजे 100ते 150 लोक येथे व 10 ते 15 लहान मोठे विध्यार्थी या वस्ती मध्ये राहतात मात्र आत्ता गेल्या आठ दिवसा पासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे या 2 की.मी रस्तावर चिखल झाला आहे आणि याच चिखलातून या वस्ती मधील ग्रामस्थांना व विध्यार्थी यांना चिलख तुडवुन वाट काढावी लागत आहे.
हिंगोली तालुक्यातील बासंबा परिसरातील साबळेवाडी वस्तीतील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. वाहने तर सोडा साधे चालणेही या रस्त्यावरून कठीण झाले आहे. चिखलाच्या रस्त्यावरून पायाच्या बोटांना चिखल्या आल्या आहेत, अशी तक्रार या भागातील ग्रामस्थांनी केली आहे.
मागच्या अनेक वर्षांपासून या भागातील ग्रामस्थांना पावसाळ्याच्या दिवसांत अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. साबळेवाडी भागातील रस्ते दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. परंतु, साधा मुरुमही या भागातील रस्त्यांवर टाकण्यात आला नाही.
त्यामुळे गुडगाभर चिखलातूनच शाळकरी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना ये-जा करावी लागत आहे या भागातील रस्ते दुरुस्त करावे यासाठी निवेदन तरी किती द्यावे असा प्रश्न या भागातली ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
तीन वर्षापुर्वी ग्रामस्थांनी वर्गणी जमा करून केली रस्त्याची डागडुजी
गेल्या तीन वर्षी या भागातील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी वर्गणी जमा करून रस्त्यावर मुरूम व काही टीकानी पाईप टाकले होते. मात्र संबधित विभागाला अजुन या रस्त्याची आठवण येत नाही असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. सध्या गेल्या आठ दिवसा पासून जिल्ह्यातील पासून पडत आहे.
त्यामुळे या रस्त्यावर चिखल झाला आहे त्यामुळे ग्रामस्थांना व शाळेतील विध्यार्थी यांना या चिखलातून वाट काढावी लागत आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने तत्काळ हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी भारत साबळे संजय साबळे परसराम साबळे व ईतर ग्रामस्थांनी केली आहे.





