Hindus in Bangladesh : ‘अजानच्या वेळी हिंदूना पूजा करता येणार नाही’, बांगलादेशात सरकारने काढले तुघलकी फर्मान…

Hindus in Bangladesh : बांगलादेशात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर हिंदू समुदायांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारने आणखी एक तुघलकी फर्मान जारी केले आहे. त्यानुसार बांगलादेशातील हिंदू यापुढे अजानच्या वेळी पूजा करू शकणार नाहीत. अजान आणि नमाज दरम्यान हिंदू समाजातील लोकांना भजन ऐकण्यास आणि लाऊडस्पीकर वाजवण्यास बंदी असेल. या संदर्भात अंतरिम सरकारचे गृह मंत्रालयाचे सल्लागार आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल मोहम्मद जहांगीर आलम चौधरी यांनी आदेश जारी केला आहे.
बांगलादेशच्या गृहमंत्रालयाने जारी केलेल्या हिंदूविरोधी आदेशात म्हटले आहे की, जर कोणी या नियमांचे उल्लंघन करताना आढळले तर पोलीस त्याला कोणत्याही वॉरंटशिवाय अटक करतील. दरम्यान, बांगलादेशमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सरकार चालवत असलेल्या शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या ठिकाणी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलत असल्याचा दावा केला होता. पण, आता अंतरिम सरकारने आता तुघलकी फर्मान जारी केले आहे.
बांगलादेशात सत्ताबदल झाल्यापासून 300 हिंदू कुटुंबे आणि त्यांच्या घरांवर हल्ले झाले आहेत. याशिवाय हिंदूंच्याबाबत मॉब लिंचिंगच्या चार मोठ्या घटना घडल्या आहेत. 10 हून अधिक हिंदू मंदिरांमध्ये तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. याशिवाय विविध ठिकाणी 49 हिंदू शिक्षकांचे सक्तीचे राजीनामे घेण्यात आले आहेत. दुसरीकडे हत्याकांड करणाऱ्या दहशतवाद्यांना तुरुंगातून सोडले जात आहे. आता नव्या आदेशानंतर दुर्गापूजा मंडपात पूजा आणि लाऊडस्पीकर वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
बांगलादेशच्या गृहमंत्र्यांचा व्हिडिओ होत आहे व्हायरल…
सरकारी आदेशात म्हटले आहे की, पुढील महिन्यात 9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर दरम्यान बांगलादेशात दुर्गा पंडाल(मंडप) स्थापन करणाऱ्या समित्यांनाही या निर्णयाचे पालन करावे लागेल. या सर्व पूजा मंडपांमध्ये अजानच्या पाच मिनिटे आधी सर्व प्रकारची पूजा आणि धार्मिक विधी थांबवावे लागतील. अजान आणि नमाज दरम्यान लाऊडस्पीकरवर भजन ऐकण्यास आणि धार्मिक मंत्रांचा उच्चार करण्यावर पूर्णपणे बंदी असेल.
Meet the Bangladeshi Home Minister Advisor who is directing that Hindus must stop their pujas, music, & any rituals 5 minutes before Azan—or face arrest.
This is new Talibani #Bangladesh. But no Bollywoodiya will hold placards for Bangladeshi Minorities because they are Hindus. pic.twitter.com/iI6T9ODSQm
— Radharamn Das राधारमण दास (@RadharamnDas) September 10, 2024
स्थानिक मीडियामध्ये असे वृत्त आहे की, हा आदेश जारी करण्यापूर्वी एक बैठक झाली, त्यानंतर अंतरिम सरकारचे गृह व्यवहार सल्लागार मोहम्मद जहांगीर आलम चौधरी यांनी मीडियासमोर येऊन बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. यासंबंधीचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दुर्गा पूजेवर प्रतिकिया देताना चौधरी म्हणाले की, ”पूजा समित्यांना शासनाच्या या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अजानच्या पाच मिनिटे आधी सर्व संगीत आणि ध्वनी उपकरणे बंद करणे बंधनकारक असेल. यावर्षी देशभरात एकूण 32,666 पूजा मंडप उभारण्यात येणार आहेत. यापैकी 157 मंडप ढाका दक्षिण शहरात आणि 88 उत्तर शहरात असतील. अशा परिस्थितीत देशात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, याची पुरेपूर काळजी सरकार घेत आहे. सरकार दुर्गापूजा मंडपांना सुरक्षा पुरवणार आहे. केवळ पूजेपासूनच नव्हे तर मूर्ती बनवण्यापासून संपूर्ण उत्सवापर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. धार्मिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आश्वासनही पूजा समित्यांनी दिले आहे. अशी माहिती चौधरी यांनी दिली.
IND vs BAN Test Series : भारत दौऱ्यासाठी बांगलादेशच्या संघाची घोषणा; ‘या’ युवा खेळाडूला मिळाली संधी…
बांगलादेशात दुर्गा पंडालची संख्या होऊ शकते कमी…
यावरून भारतासह जगात कोणत्या प्रकारची दुहेरी वृत्ती अवलंबली जात आहे, याचा अंदाज येऊ शकतो. गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये 33 हजारांहून अधिक दुर्गा पंडाल (मंडप) उभारण्यात आले होते, ज्यांची संख्या यावेळी कमी होण्याची अपेक्षा आहे. दुर्गा पूजा हा बांगलादेशातील हिंदू समुदायाचा सर्वात मोठा धार्मिक सण आहे. बांगलादेशी हिंदू 9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर दरम्यान दुर्गा पूजा साजरी करतील. मात्र त्याआधीच तालिबानी आदेश जारी केल्यामुळे बांगलादेश सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका होत आहे.





