“हिंदूंनो परत जा…” ; अमेरिकेत पुन्हा मंदिराची विटंबना, दूतावासाकडून निषेध

Temple desecration in America । अमेरिकेत मागच्या १ ० दिवसनपासून हिंदू मंदिरांची विटंबना होताना दिसून येत आहे. कारण न्यू यॉर्कमध्ये एका मंदिराची १० दिवसांपूर्वी विटंबना करण्यात आली होती. या विरोधात भारतीय दुतावासाने निषेध नोंदवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आता कॅलिफोर्नियातील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिराची तोडफोड करण्यात आली असल्याची घटना घडली आहे.एवढंच नाही तर “हिंदूंनो परत जा..” अशा हिंदुविरोधी घोषणाही यावेळी देण्यात आल्या असल्याची माहिती एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिली आहे.
मंदिराची विटंबना करण्यात आली Temple desecration in America ।
याविषयी माहिती देताना ,“न्यू यॉर्कमधील मेलव्हिल येथील स्वामीनारायण मंदिराची विटंबना झाल्यानंतर १० दिवसांनी सॅक्रामेंटो कॅलिफोर्निया येथील आमच्या मंदिराची विटंबना करण्यात आली आहे. द्वेषपूर्ण संदेशांसह ही तोडफोड करण्यात आली”, अशी माहिती BAPS हिंदू संघटनेने का निवेदनातून दिली. पुढे त्यांनी “आमचा निषेध कायम राहील. आमचे दुःख यामुळे आणखीनच वाढले आहे. अंतःकरणात द्वेष असलेल्या प्रत्येकासाठी आमच्या प्रार्थना अधिक दृढ झाल्या आहेत”, असेही निवेदनात म्हटलं आहे.
धार्मिक कट्टरता आणि द्वेषाला जागा नाही Temple desecration in America ।
यूए हाऊसमध्ये सॅक्रामेंटा काऊंटीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अमी बेरा यांनी या घनटेचा निषेध केला आणि लोकांना असहिष्णतेविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले. “#SacramentoCountry मध्ये धार्मिक कट्टरता आणि द्वेषाला जागा नाही. आपल्या समाजातील या उघड कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. आपण सर्वांनी असहिष्णूतेच्या विरोधात उभे राहायला हवे आणि आपल्या समाजातील प्रत्येकाला सुरक्षित आणि आदरणीय वाटेल याची खात्री केली पाहिजे”, असं त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने सिनेट न्यायिक समितीला पत्र लिहून एफबीआय आणि कॅलिफोर्निया या दोन्ही राज्यांच्या डेटाचा हवाला देऊन हिंदूंविरोधी द्वेषाचा इतिहास आणि विशेषतः हिंदू प्रार्थनास्थळांबाबत चिंताजनक वाढ यावर तपशीवार अहवाल दिला आहे.
हेही वाचा
“ते भारतीय आहेत की परदेशी?” ; राहुल गांधींच्या नागरिकत्वावर उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल





