हिना खानची तब्येत बिघडली; फोटो शेअर करत म्हणाली…

Heena Khan Health Update| टीव्ही अभिनेत्री हिना खानने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. याशिवाय ती सध्या विविध प्रोजेक्टमध्ये देखील काम करताना दिसते. अनेकदा आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे कामाच्या गडबडीत आपण आरोग्यकडे पूर्णत: दुर्लक्ष करतो. हेच हिना खानबाबत झाले आहे. सध्या ती एका शूटसाठी खूप मेहनेत घेत आहे. मात्र तब्बल 16 तास काम केल्यामुळे तिची प्रकृती बिघडली आहे. याबाबत तिने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे.
हिना खानने इनस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती मेकअपदरम्यान जेवण करताना दिसत आहे. हिनाने या फोटोसोबत लिहिले आहे की, जेव्हा तुम्हाला कामाच्या दरम्यान असे अन्न खावे लागते. एका वेळी आरामात अन्नही खाऊ शकत नाही. यानंतर तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे.
सलग 16 तास शूटिंग केल्यामुळे… Heena Khan Health Update|
पुढच्या फोटोमध्ये हिना खान चेहऱ्यावर मास्क लावून बेडवर झोपलेली दिसत आहे. या फोटोसह अभिनेत्रीने सांगितले की, आजकाल असेच झोपावे लागत आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा. पुढील फोटोमध्ये हिनाने खुलासा केला आहे की, सलग 16 तास शूटिंग केल्यामुळे तिची ही अवस्था झाली आहे.
यापूर्वी हिना खानने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. याला कॅप्शन तिने “मला गंभीर गॅस्ट्रोसोफेजल रिफ्लक्स (Gastroesophageal reflux disease- GERD) आजार झाला आहे. रमजानमध्ये जर मी उपवास करत राहिले तर माझी तब्येत अजून खराब होते,” असे म्हंटले होते.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर हिना खान अलीकडेच मुनावर फारुकीसोबत हलकी हलकी से बरसात या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. टीव्ही मालिकांव्यतिरिक्त हिनाने चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम केले आहे.
हेही वाचा:
लोकसभा निवडणुकीत ‘या’ दोन राज्यात भाजपला बसणार मोठा फटका; सर्वेक्षणातून माहिती समोर





