ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानवर होतोय कौतुकाचा वर्षाव

Hina Khan | अभिनेत्री हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. यादरम्यानचे अनेक व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. मात्र या कठीण परिस्थितीचा ती मोठ्या हिंमतीने सामना करत आहे. काही दिवसांपूर्वीच ती नववधूच्या रूपात विग घालून आत्मविश्वासाने रॅम्प वॉक करताना दिसली होती.
याशिवाय ती विविध कार्यक्रमांना देखील हजर राहत असल्याचे दिसते. यातच आता हिनाने पुन्हा एकदा रॅम्प वॉक करून सर्वांना आश्चर्यचकित केले. भारतातील सर्वात मोठे फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्यासाठी हिनाने रॅम्प वॉक केला. यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती. हिनाने गुलाबी रंगाचा सलवार सूट घातला होता. ज्यावर भरजरी वर्क होते. कर्करोगाशी लढा देत असतानाही हिना खान हिंमत न हारल्याबद्दल चाहत्यांकडूनही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. Hina Khan |
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेत्री हिना खान ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहचली. तिने मालिकांसह काही शोमध्ये देखील सहभाग घेतला होता. हिना खानने जून 2024 मध्ये धाडसाने स्टेज थ्री ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानाची एक पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. तेव्हापासून ती सोशल मीडियावर सतत तिच्या तब्येतीचे अपडेट्स देत असते. चाहते देखील ती लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. तसेच तिच्या धाडसीपणाचे कौतुक करत आहे. Hina Khan |





