‘ब्रेस्ट कॅन्सर’ने त्रस्त असलेल्या ‘हिना खान’ पोस्टमध्ये व्यक्त केली ‘वेदना’

Hina Khan Breast Cancer । टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. खरं तर अभिनेत्रीला स्तनाच्या कर्करोगाने ग्रासले आहे. सध्या हिना खानची केमोथेरपी सुरू आहे. हिना तिच्या उपचाराबाबतचे प्रत्येक अपडेट फॅन्ससोबत शेअर करत आहे. या सगळ्यामध्ये अभिनेत्रीच्या एका ताज्या पोस्टने चाहत्यांना दु:खी केले आहे. हिनाने पोस्टमध्ये सांगितले आहे की, ‘केमोथेरपीच्या दुष्परिणामांमुळे तिला एक नवीन आजार झाला आहे.’
View this post on Instagram
Hina Khan Breast Cancer । हिना खानला आता म्यूकोसायटिसचा त्रास आहे
हिना खान स्टेज थ्री ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. आता अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे खुलासा केला आहे की, केमोथेरपीच्या दुष्परिणामांमुळे तिला म्यूकोसायटिसचा त्रास होत आहे. हिनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “केमोथेरपीचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे म्यूकोसिटिस. मात्र, त्याच्या उपचारासाठी मी डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत आहे. तुमच्यापैकी कोणाला यातून गेले असेल किंवा काही उपयुक्त उपाय माहित असल्यास कृपया सुचवा. आपण खाऊ शकत नाही तेव्हा हे खरोखर कठीण आहे. मला मदत करा.”
हिनाने चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले.तसेच तिने हेल्थ अपडेट दिले आहे.हिनाने नुकतेच इंस्टाग्रामवर हेल्थ अपडेट शेअर केले होते आणि सांगितले होते की तिने केमोथेरपीची पाचवी फेरी पूर्ण केली आहे, तर अजून तीन सेशन्स बाकी आहेत. आजारपणातही ती काम करत आहे. यामुळे चाहते तिचे सोशल मीडियावर कौतुक करत आहे.
हिना खानच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, 2009 मध्ये ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या मालिकेतून तिला बरीच ओळख मिळाली. त्यानंतर ती बिग बॉस 11 आणि बिग बॉस 14 सारख्या शोमध्ये दिसली. यानंतर ती कसौटी जिंदगी के मध्ये कोमोलिकाच्या भूमिकेतही दिसली आहे. हिना खानने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे, ज्यामध्ये विक्रम भट्टचा चित्रपट ‘हॅक्ड’ देखील आहे.





