Hina Khan । Breast Cancer : हिना खानची नवीन पोस्ट चर्चेत; कीमोथेरेपीमुळे असे झाले अभिनेत्रीचे हाल, नेटकऱ्यांनी दिला धीर !

Hina Khan । Breast Cancer : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहचली. मात्र काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली आहे. हिना खान एका आजाराशी झुंज देत आहे. याबाबत एक पोस्ट शेअर करत तिने खुलासा केला होता.
हिना खानने लिहिले आहे की, ‘मी ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या टप्प्यात असल्याच्या अलीकडच्या अफवांबाबत मला काही महत्त्वाच्या बातम्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. मला हिनाहोलिक आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि काळजी करणाऱ्या सर्व लोकांसोबत काही महत्त्वाच्या बातम्या शेअर करायच्या आहेत.
मला स्टेज थ्री ब्रेस्ट कॅन्सर आहे. असे असूनही मी सर्वांना सांगू इच्छितो की मी ठीक आहे. या आजारावर मात करण्यासाठी मी मजबूत, दृढनिश्चय आणि पूर्णपणे वचनबद्ध आहे. माझे उपचार सुरू झाले आहेत आणि यातून आणखी मजबूत होण्यासाठी मी शक्य ते सर्व काही करण्यास तयार आहे.’
हिना खानने चाहत्यांकडून काही गोपनीयतेची मागणी केली.’मला या काळात तुमच्याकडून काही आदर आणि गोपनीयता हवी आहे. मी माझे कुटुंब आणि जवळच्या लोकांसोबत सकारात्मक राहीन. देवाच्या कृपेने, आम्हाला खात्री आहे की मी या आव्हानावर मात करेन आणि पूर्ण बरे होईल. कृपया आपल्या प्रार्थना, आशीर्वाद आणि प्रेम पाठवत रहा.’ असं अभिनेत्री म्हणाली.
दरम्यान, अश्यातच अभिनेत्रीने आणखी पोस्ट इंस्टारग्रामवर शेअर केली असून यामध्ये हिना खानने केमोथेरपीमुळे आपल्या शरीरावर झालेल्या खुणा तिने दाखवल्या आहेत. तिने कॅप्शनमध्ये विचारले, ‘तुन्हाला या फोटोत काय दिसतेय? माझ्या अंगावरचे चट्टे की डोळ्यात आशा? आशा माझ्या डोळ्यात आहे, माझ्या आत्म्याची सावली आहे. मी माझ्या बरे झालेल्या जखमा दाखवत आहे’. या आशयाची पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे. सध्या तिच्या या पोस्टवर नेटकरी कमेंट करत असून, अभिनेत्रीला आधार देताना दिसत आहेत.
दरम्यान, हिना खानच्या या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांनी तिला धीर दिला. डेझी शाह, जय भानुशाली, अंकिता लोखंडे, लता सबरवाल, प्रियल गौर, आश्का गोराडिया, सायंतानी घोष, रोहन मेहरा, श्रद्धा आर्य, गौहर खान, अदा खान, आमिर अली आणि इतरांनी अभिनेत्रीला धीर दिला आणि तिच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेमुळेच अभिनेत्री यशाच्या शिखरावर चढली. टीव्ही विश्वात सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून हिना खान हिची ओळख आहे. त्यानंतर हिनाने कधीच मागे वळून पाहिलं नाही. मालिकांशिवाय हिना जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील पैसे कमावते. सोशल मीडियावर देखील हिना कायम सक्रिय असते. पण आता अभिनेत्रीला कॅन्सर झाल्यामुळे चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.






