Himalayan 450 Mana Black : भारतीय बाजारात रॉयल एनफील्डने आपल्या लोकप्रिय ‘हिमालयन 450’ या मोटरसायकलचा एक रॅली-थीम असलेला ‘माना ब्लॅक’ वेरिएंट सादर केला आहे. या नव्या मॉडेलमध्ये स्टँडर्ड व्हर्जनच्या तुलनेत अधिक दमदार अॅक्सेसरीज आणि स्पोर्टी ब्लॅक कलर दिला आहे. दरम्यान, अधिकृत लॉन्चची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी नोव्हेंबर 2025 च्या अखेरीस ही बाइक विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कंपनी मोटोवर्स 2025 (21 ते 23 नोव्हेंबर, गोवा) मध्ये याच्या किंमतीची घोषणा करू शकते. अंदाजे किंमत ₹3.5 लाख असण्याची शक्यता आहे. डिझाईन आणि फीचर्स : रॅली-इन्स्पायर्ड रियर प्रोफाइल आणि लांब, सपाट सीट फुल-लेंथ ब्लॅक नकल गार्ड अॅल्युमिनियम ब्रेस आणि नवीन नंबर प्लेट होल्डर सीट हाइट – 825 मिमी कर्ब वेट – 195 किलो (स्टँडर्ड मॉडेलपेक्षा 1 किलो हलकी) इंजिन आणि परफॉर्मन्स : हिमालयन 450 माना ब्लॅकमध्ये आधीच्या मॉडेलप्रमाणेच दमदार इंजिन दिले असून, त्याची परफॉर्मन्स रॅली राइडसाठी अधिक ट्यून केली गेली आहे. लवकरच बुलेट 650 देखील : रॉयल एनफील्डने बुलेट 650 देखील सादर केली आहे. या मॉडेलमध्ये 648cc पॅरेलल-ट्विन इंजिन असून 47 BHP पॉवर आणि 52.3 Nm टॉर्क जनरेट करते. डिझाईन: बुलेट 350 प्रमाणे पारंपरिक क्लासिक लूक, क्रोम हुड असलेली गोल LED हेडलाइट आणि टिअरड्रॉप आकाराचा मेटल टँक. सस्पेंशन: पुढे – 120 मिमी ट्रॅव्हलसह Showa टेलिस्कोपिक फोर्क मागे – 112 मिमी ट्रॅव्हल असलेले ट्विन शॉक अॅब्झॉर्बर्स कलर ऑप्शन: काळा आणि निळा रॉयल एनफील्डच्या या नव्या रॅली व क्लासिक बाइक्समुळे कंपनी पुन्हा एकदा अॅडव्हेंचर आणि हेरिटेज या दोन्ही सेगमेंटमध्ये जोरदार उपस्थिती नोंदवणार आहे.