Royal Enfield Bikes : भारतीय दुचाकी बाजारात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘Royal Enfield’ कंपनीने आज (2026) आपल्या लोकप्रिय रोडस्टर मालिकेतील 2026 Royal Enfield Guerrilla 450 Apex या नव्या व्हेरियंटचे अधिकृत लाँचिंग केले. ग्राहकांच्या फीडबॅकचा विचार करून कंपनीने या मॉडेलला अधिक रोड-ओरिएंटेड, स्पोर्टी आणि दैनंदिन वापरासाठी सोयीस्कर बनवले आहे. नवीन Guerrilla 450 Apex ची एक्स-शोरूम किंमत 2.49 लाख रुपयांपासून सुरू होत असून, शहरातील राइडिंग आणि वीकेंड टूरिंग करणाऱ्या रायडर्ससाठी ही बाइक आकर्षक पर्याय ठरणार आहे. ग्राहकांच्या अपेक्षेनुसार मोठे अपडेट : ‘Royal Enfield ने Guerrilla 450’ ला अधिक प्रॅक्टिकल बनवण्यासाठी अनेक सुधारणा केल्या आहेत. आधीच्या मॉडेलमध्ये ऑफ-रोड शैलीची झलक अधिक होती; मात्र आता बाइक पूर्णपणे रोडस्टर अनुभव देण्यासाठी अपडेट करण्यात आली आहे. विशेषतः हँडलिंग, टायर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या तीन प्रमुख विभागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. Royal enfield, Guerrilla 450 apex प्रमुख वैशिष्ट्ये : लोअर आणि रीपोजिशन्ड अॅल्युमिनियम हँडलबार्स अधिक आक्रमक रायडिंग पोझिशन शार्प कॉर्नरिंगसाठी पुढे झुकलेले वजन संतुलन फ्रंट आणि रियर काउल्समुळे रेसिंग-इन्स्पायर्ड लुक यामुळे बाइकचा लुक अधिक प्रीमियम आणि परफॉर्मन्स-ओरिएंटेड दिसतो. रोड-फोकस्ड टायर्समुळे सुधारलेली ग्रिप : पूर्वीच्या ब्लॉक-पॅटर्न टायर्सबाबत आलेल्या तक्रारी लक्षात घेऊन Apex व्हेरियंटमध्ये Vredestein Centuro ST रोड-फोकस्ड टायर्स देण्यात आले आहेत. ड्राय आणि वेट दोन्ही रस्त्यांवर उत्तम पकड अधिक स्थिर हाय-स्पीड राइड शहरातील वापरासाठी सुधारलेली कंट्रोल इतर व्हेरियंट्समध्ये Ceat Gripp XL RE टायर्सचे अपडेटेड कंपाऊंड देण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये स्मार्ट बदल : Eco आणि Performance रायडिंग मोड्स निवडलेला मोड इग्निशन बंद केल्यानंतरही कायम राहतो (Persistent Mode) अधिक सोयीस्कर रायडिंग अनुभव नवीन आकर्षक कलर ऑप्शन्स : अपेक्स लाल अपेक्स काळा अपेक्स हिरवा ट्विलाईट निळा पेक्स कांस्य शॅडो ॲश स्मोक चंदेरी ब्रावा निळा व्हेरियंटनुसार किंमत (एक्स-शोरूम) : Apex Red 2,49,194 Apex Black / Green 2,56,387 Dash Twilight Blue 2,49,194 Dash Shadow Ash / Smoke Silver / Peix Bronze 2,76,116 Flash Brava Blue 2,72,479 इंजिन आणि तांत्रिक वैशिष्ट्ये : Guerrilla 450 मध्ये कंपनीचे शक्तिशाली 452cc लिक्विड-कूल्ड Sherpa इंजिन कायम ठेवण्यात आले आहे. परफॉर्मन्स: पॉवर: 39.47 bhp @ 8,000 rpm टॉर्क: 40 Nm @ 5,500 rpm 6-स्पीड गियरबॉक्स असिस्ट आणि स्लिपर क्लच चेसिस आणि सस्पेन्शन: स्टील ट्विन-स्पार फ्रेम 43mm टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स (140mm ट्रॅव्हल) रिअर मोनोशॉक (150mm ट्रॅव्हल) ब्रेकिंग: 310mm फ्रंट डिस्क 270mm रिअर डिस्क ड्युअल-चॅनल ABS इतर तपशील: कर्ब वेट: 182.5 kg फ्यूल टँक: 11 लिटर ही बाइक Royal Enfield Himalayan 450 च्या प्लॅटफॉर्मवर आधारित असून रोडस्टर स्टाइलसाठी खास ट्यून करण्यात आली आहे.