Himachal Pradesh Assembly Election 2022 : तिकीट वाटपावरून कॉंग्रेसमध्येही प्रचंड नाराजी, मात्र कॉंग्रेसच्या नेत्या…

मंडी – हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या तिकिट वाटपावरून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीत असंतोष निर्माण झाला असताना आता कॉंग्रेस या प्रमुख विरोधी पक्षातही तिकिट वाटपावरून प्रचंड नाराजी पसरली असल्याची बातमी आहे. मात्र या राज्यातील कॉंग्रेसच्या बड्या नेत्या प्रतिभा सिंह यांन या वृत्ताचा इन्कार केला आहे.
पुढच्या महिन्यात होणाऱ्या निवडणुकांच्या अनुशंगाने कॉंग्रेस पक्षाने अगोदरच चाचपणी केली होती. आम्ही सगळे सोबत असून पक्षात कोणतीही अस्वस्थता नाही असा दावा त्यांनी केला आहे. या निवडणुका जिंकणे आमच्यासाठी किती महत्वाचे आहे याची आम्हाला सगळ्यांनाच कल्पना असल्याचेही त्यांन नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अगोदरच येथे सभा घेत प्रचारात आघाडी घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष भाजपच्याही अगोदर सक्रिय झाला होता. मात्र नंतर आपने आपला सगळा प्रचार आणि ताकद गुजरातकडे वळवल्यामुळे येथे भाजपला आव्हान फक्त कॉंग्रेसचेच असणार आहे. कॉंग्रेसची प्रचाराची धुरा आणि ग्लॅमर सगळे प्रियंका गांधी वडार यांच्यावर अवलंबून आहे. मात्र त्यांनी अद्याप म्हणावी तश गती येथील हालचालींना दिलेली नाही.
दरम्यान, तिकिट वाटपात कोण कोणत्या नेत्याच्या कित जवळचा आहे याचे निकष आम्ही लावलेले नाही तर उमेदवाराच जिंकून येण्याची पात्रता गृहीत धरून सर्वोत्तम उमेदवार देण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिभा सिंह यांनी म्हटले आहे. प्रतिभा या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे दिग्गज नेते विरभद्र सिंह यांच्या पत्नी आहेत.





