Hilary Swank: ऑस्कर विजेती अभिनेत्री वयाच्या 51 व्या वर्षी तिसऱ्यांदा होणार आई
Hilary Swank : हिलरी स्वँकने खास अंदाजात केली होती प्रेग्नेंसीची घोषणा

Hilary Swank: हॉलीवूडची ऑस्कर विजेती अभिनेत्री हिलरी स्वँक वयाच्या 51 व्या वर्षी तिसऱ्यांदा आई होणार आहे. हिलरी स्वँक आणि तिचा पती फिलिप श्नायडर दोघेही तिसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज आहे.
गुरुवारी न्यूयॉर्क शहरात एका कार्यक्रमातून बाहेर पडताना हिलरी स्वँक पांढऱ्या रंगाच्या क्रॉप वेस्टमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहत. त्यानंतर चाहते आणि कलाकार मंडळी अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, हिलरी स्वँक खास अंदाजात आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली. अनेक जण तिला विचारायचे की तुझा पुढचा प्रोजेक्ट काय आहे? यावर तिने एक मजेदार व्हिडिओ टाकला. त्या व्हिडिओमध्ये ती, तिचा नवरा आणि तिची दोन लहान मुले डान्स करत आहेत. सोबतच कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “अनेक लोक मला विचारत आहेत की माझा पुढचा प्रोजेक्ट कोणता आहे, तर तो डिसेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे.” यावरून तिचे बाळ डिसेंबरमध्ये जन्माला येणार असल्याचे तिने सांगितले.
हिलरी आणि फिलिप श्नायडर यांनी 2018 मध्ये लग्न केले होते. एप्रिल 2023 मध्ये तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. ज्यांची नाव ‘ओहम’ (मुलगा) आणि ‘आया’ (मुलगी) अशी आहेत. आता तिसऱ्यांदा वयाच्या 51 व्या वर्षी आई होणार असल्याने अनेकांनी तिच्या निर्णयाचे कौतुक केले. हिलरी हॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री असून, ‘मिलियन डॉलर बेबी’ या सिनेमासाठी तिला ऑस्करही मिळाला होता.
हेही वाचा:





