राजनाथ सिंह, गडकरींपासून ते शहांपर्यंत… कोणत्या मंत्र्याकडे अर्थसंकल्पातील सर्वाधिक पैसा?, वाचा सविस्तर

Highest Money of Budget । एनडीए आघाडीच्या मदतीने भाजपने केंद्रात पुन्हा एकदा सरकार स्थापन केले आहे. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. मोदी 3.0 कॅबिनेटमध्ये पंतप्रधान मोदींनी राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन आणि एस. जयशंकर यांच्यासारख्या अनेक दिग्गजांना त्यांचे जुने मंत्रिपद देण्यात आलंय. मात्र, शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर अशा काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आलाय.
फेब्रुवारी 2024 मध्ये, निर्मला सीतारामन यांनी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 47.67 लाख कोटी रुपयांचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. आता नव्या मंत्रिमंडळाने पदभार स्वीकारल्यानंतर जुलैमध्ये पुन्हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. भाजपच्या मागील कार्यकाळातील अनेक धोरणे अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे यावेळचा अर्थसंकल्प अतिशय खास असणार असल्याचे मानलं जातंय. अर्थव्यवस्थेचा विचार करता पायाभूत, संरक्षण आणि इतर क्षेत्रांसाठी काही मोठ्या घोषणा होऊ शकतात. जुन्या अर्थसंकल्पातील मोठा हिस्सा कोणत्या मंत्र्याला वाटला गेला ते जाणून घेऊया.
निर्मला सीतारामन Highest Money of Budget ।
सीतारामन पुन्हा अर्थमंत्रालय सांभाळतील. अंतरिम अर्थसंकल्पात, अर्थ मंत्रालयाला 18.5 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. जी एकूण बजेटच्या 39% इतकी होती. त्यांच्याकडे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय देखील आहे. ज्यांचे आर्थिक वर्ष 2025 चे बजेट 667 कोटी रुपये आहे.
राजनाथ सिंह
राजनाथ सिंह दुसऱ्यांदा संरक्षण मंत्री बनले असून संरक्षण मंत्रालयाचे एकूण बजेट ६.२ लाख कोटी रुपये आहे. २०२५ या आर्थिक वर्षाच्या एकूण अर्थसंकल्पात त्याचा वाटा दुसऱ्या क्रमांकाचा (१३%) आहे.
शिवराज सिंह चौहान
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात नवीन सदस्य आहेत, त्यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालय आहे. कृषी मंत्रालयाला 1.3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर ग्रामीण विकासासाठी 1.8 लाख कोटी रुपयांचे बजेट आहे. चौहान यांचा एकूण बजेटमध्ये 6.5% वाटा आहे.
अश्विनी वैष्णव
रेल्वेमंत्र्यांकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचाही कार्यभार आहे. रेल्वेचे बजेट 2.55 लाख कोटी रुपये आहे, तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे बजेट 21,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे बजेट 4,000 कोटी रुपये आहे. वैष्णव एकूण बजेटपैकी 5.9% हाताळत आहेत.
नितीन गडकरी Highest Money of Budget ।
नितीन गडकरी पुन्हा एकदा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री झाले आहेत. ते मंत्रालयासाठी वाटप केलेल्या 2.78 लाख कोटी रुपयांचे व्यवस्थापन करतील, जे देशाच्या बजेटच्या 5.8% आहे, जे पाचव्या क्रमांकाचे आहे.
जेपी नड्डा
भाजपच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षांना केंद्र सरकारमध्ये रसायन आणि खते मंत्रालयाचे मंत्री करण्यात आले आहे. या मंत्रालयाचे बजेट 1.68 लाख कोटी रुपये आहे आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे बजेट 90,000 कोटी रुपये आहे. ते एकूण 2.59 लाख कोटी रुपये किंवा राष्ट्रीय बजेटच्या 5.4% हाताळतात.





