satara | हाय व्होल्टेजमुळे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळाले

कुडाळ, (प्रतिनिधी) – जावळी तालुक्यातील कुडाळ या गावामध्ये बोराटे वस्ती परिसरामध्ये हाय व्होल्टेज लाईटमुळे कुडाळ येथे तीन टीव्ही चार फ्रीज चार मिक्सर व इलेक्ट्रिक साहित्य जळून तब्बल 70 ते एक लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. वीज वितरण मंडळाचा या भोंगळ कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
अचानक विद्युत प्रवाह सुरू असतानाच मोठ्या प्रमाणात हाय होल्टेज आला आणि सुरू असणारे टीव्ही जळाले. तर फ्रीजचे आयसी उडाले. ट्यूबलाईट जळाल्या. असे मोठे नुकसान शेतकऱ्यांचे ग्रामीण भागात झाले आहे.
जावळी तालुक्यात काही ठिकाणी पोल वाकलेले आहेत तर काही ठिकाणी डीपी जळाल्या आहेत. वीज वितरण महा मंडळाला अद्यापही जाग आलेली नाही. त्याचाच प्रत्येय हाय व्होल्टेज येऊन जळलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्य जळाल्यानंतर समोर बाब आली आहे.
या ठिकाणी लाईट बिल थकले असते तर कट करण्यासाठी अधिकारी मात्र धावत आले असते. परंतु अद्याप कोणताही अधिकारी इथे फिरकला नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही महावितरण कार्यालयासमोर जाऊन आंदोलन करू, असा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे.





