CWG 2022 | तेजस्वीन शंकर राष्ट्रकुलला पात्र
Updated On:

नवी दिल्ली – भारताचा उंच उडी क्रीडा प्रकारातील खेळाडू तेजस्वीन शंकर याने यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची पात्रता मिळवली आहे. शंकरने यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करताना आउटडोअर ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत 2.27 मीटर उडी मारत सुवर्णपदकाला गवसणी घातली व राष्ट्रकुल स्पर्धेची पात्रता मिळवली.
यंदाची स्पर्धा इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे होणार आहे. शंकर कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधित्व करत असून येथे बिझनेस एडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेत आहे. 2018 सालानंतरचे हे त्याचे दुसरे सुवर्णपदक ठरले आहे.
2016 साली शंकरने 2.26 मीटरचा राष्ट्रीय विक्रम केला होता. कोईम्बतूर येथे झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत त्याने हरिशंकर रॉयचा विक्रम मोडला होता. तसेच 2018 साली त्याने स्वतःचाच विक्रम मागे टाकला होता.





