Mahua Moitra : महुआंना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
Updated On:

Mahua Moitra – तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आल्यानंतर त्यांना खासदार म्हणून देण्यात आलेला सरकारी बंगलाही सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्याच्याच विरोधात महुआ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने यासंदर्भात त्यांना कोणता दिलासा देण्यास नकार दिला आहे.
महुआ यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आज फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे खासदारकी गमावल्यानंतर महुआंना आता दिल्लीतील घरही गमवावे लागणार आहे.





