Pune News : ध्वनी प्रदूषणाला लगाम; उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पुणेकर मंचाकडून स्वागत
Pune News : धार्मिक आणि सार्वजनिक मिरवणुकांमधील वाढत्या ध्वनी प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या कडक निर्देशांचे 'लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाने' मनापासून स्वागत केले आहे.

Pune News : धार्मिक मिरवणुकांमधील ध्वनी प्रदूषणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे ‘लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचा’ने स्वागत केले आहे. सण गोंगाटात नव्हे, तर उत्साहात आणि आनंदात साजरे करण्याचे आवाहन मंचाने केले आहे. (Pune News)
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने धार्मिक मिरवणुकांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची स्वतःहून दखल घेतली होती. सुनावणीनंतर खंडपीठाने सविस्तर आदेश नंतर जारी केला जाईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, तातडीने अंमलबजावणीसाठी काही निर्देश देण्यात आले आहेत. Pune News()
त्यानुसार सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. मिरवणुकांसाठी मंडळांना देण्यात आलेली परवानगी दर्शनी ठिकाणी प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Pune News)
मिरवणुकांदरम्यान पोलिसांनी आणि संबंधित सक्षम यंत्रणांनी ध्वनी पातळीची नोंद घेऊन नियमन करावे, तसेच निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. ढोल पथकांकडून संगीत वाद्य म्हणून सिलिंडरचा वापर करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. (Pune News)
या निर्देशांचे मंचाने स्वागत केले आहे. ‘नागपूर आणि सोलापूरमध्ये ध्वनी प्रदूषणाबाबत जे उपाय केले जाऊ शकतात, ते पुण्यातही का होऊ नयेत,’ हा मंचाने उपस्थित केलेला प्रश्न सुनावणीदरम्यान चर्चेत आल्याचे मंचाचे म्हणणे आहे. (Pune News)
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून विविध ठिकाणी ध्वनी पातळीची मोजणी केली जाते. मात्र, प्रत्यक्ष ठिकाणी होणारे उल्लंघन रोखण्यासाठी पोलिसांसह संबंधित यंत्रणांनी प्रभावीपणे कारवाई करणे आवश्यक असल्याचे मंचाने म्हटले आहे. शांतता क्षेत्रे अधिसूचित करण्याच्या मुद्द्याचीही न्यायालयाने दखल घेतल्याचे मंचाने नमूद केले आहे. (Pune News)
पोलीस आयुक्त, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे महापालिका आयुक्त यांनी समन्वयाने काम करून ध्वनी प्रदूषणाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी मंचाने केली आहे. (Pune News)
गणेश मंडळांनीही ध्वनी प्रदूषणाबाबतच्या नियमांचे पालन करून सामान्य पुणेकरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन मंचाचे मुकुंद किर्दत यांनी केले. ध्वनी प्रदूषणाविरोधात पुणेकरांनी केलेल्या प्रयत्नांमधील हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. (Pune News)






