बारामतीत 2921 जणांचे उच्चांकी रक्तदान ; शारदा प्रांगणाला उत्सवाचे स्वरूप

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रम
बारामती- राज्यातील सत्तापालटानंतर उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या अजित पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महारक्तदान शिबीर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयासमोर शारदा प्रांगणात भव्य मंडप उभारण्यात आला होता. यावेळी महारक्तदान शिबिरात 2921 जणांनी रक्तदान केले. बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इतिहासात हा उच्चांक मानला जात आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष जय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दहा दिवसांपूर्वी कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत बैठक पार पडली होती. त्याप्रमाणे शहरातून कार्यकर्त्यांनी शिबिरात उस्फूर्त सहभाग घेतला. सर्व कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते.रक्तदान शिबिराचे माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, बारामती बॅंकेचे चेअरमन सचिन सातव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, पौर्णिमा तावरे, सुभाष सोमाणी आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. महिला राष्ट्रवादी कॉंग्रेंसच्या अध्यक्षा अनिता गायकवाड यांनी स्वत: रक्तदान करीत सहभाग नोंदविला.त्यानंतर 122 महिला कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.
शिबिराला क्रिडा राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा बॅंकेचे दिगंबर दुर्गाडे, बाजार समिती संचालक संतोष आटोळे, सतीश कोकरे, माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, अल्ताफ सय्यद, अभिजीत जाधव, सुधीर पानसरे, गणेश सोनवणे, अभिजीत चव्हाण, अतुल बालगुडे यांनी शिबीराला भेट देत कौतुक केले. यावेळी मंत्री बनसोडे यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असा कार्यक्रम मी आजपर्यंत पाहिलेला नाही, अशा शब्दांत कौतुक केले.
उपक्रमाअंतर्गत 1500 लोकांना अन्नदान करण्यात आले. तर 163 जणांचे नेत्रदानाचे अर्ज भरुन घेण्यात आले. अमजद बागवान यांनी यादगार फाउंडेशनच्या वतीने जेवण दिले.तर महेश गायकवाड यांनी नाष्टा देण्याचे नियोजन केले. संतोष सातव यांनी 400 महिलांना साड्या वाटप केले. माजी नगरसेवक अभिजीत काळे यांनी दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते.
उपमुख्यमंत्रिपदी पदावर स्वबळावर विराजमान होत राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडत अजित पवार यांनी यंदा स्वत:चा वेगळा गट स्थापन केला आहे. या पार्श्वभूमीवर यंदा बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आयोजित कार्यक्रमाची चांगलीच चर्चा रंगली. यावेळी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष जय पाटील म्हणाले, अजित पवार यांचा वाढदिवस बारामतीकरांनी उत्सव म्हणुन साजरा केला. रविवारी दिवसभर या कार्यक्रमाला 10 हजार नागरिकांनी भेट देत अजित पवार यांच्यावरील प्रेम व्यक्त केले. अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी मनोकामना सर्वांनी व्यक्त केली. त्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
शहराध्यक्ष जय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश बांदल, विशाल जाधव, निलेश इंगुले, अभिजीत काळे, साधू बल्लाळ, पार्थ गालींदे, बबलू जगताप, अजिनाथ चौधर, वैभव शिंदे, अक्षय माने, आदित्य हिंगणे, मेघराज माने, परवेज सय्यद, नवनाथ चौधर, ओंकार जाधव, असिफ बागवान, संभाजी माने, शिवम पवार, प्रताप पागळे, प्रवीण माने, अक्षय थोरात, अजिनाथ चौधर, संतोष जगताप, सर्व माजी नगरसेवक, सर्व सेलचे पदाधिकारी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम पार पडण्यासाठी अथक परिश्रम घेतले.





