Hezbollah: हिज्बुल्लाचा माध्यम प्रमुख मोहम्मद अफिफ हवाई हल्ल्यात ठार

बेरूत – इस्रायलकडून हिजबुल्लावर सातत्याने हल्ले होत आहेत. दररोज इस्रायली सैन्य हिजबुल्लाची मोठी हानी करत आहे. आता लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये इस्त्रायली हल्ल्यात हिजबुल्लाचा माध्यम विभाग प्रमुख मोहम्मद अफिफ मारला गेला.
टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, हिजबुल्लाने मोहम्मद अफिफच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मध्य बेरूतमधील सीरियन बाथ पार्टीच्या मुख्यालयावर आयडीएफच्या हल्ल्यात अफिफ मारला गेला. इस्रायलने अद्याप हिजबुल्लाच्या प्रवक्त्याच्या हत्येला दुजोरा दिलेला नाही.
अल जझीराच्या वृत्तानुसार, अफिफने हिजबुल्लाहसाठी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या आहेत, ज्यामध्ये इस्रायली बॉम्बहल्ल्याची माहिती देण्यात आली होती. अफिफने सशस्त्र गटाचे उच्च माध्यम संबंध अधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी अनेक वर्षे हिजबुल्लाहच्या अल-मनार टेलिव्हिजन स्टेशनचे व्यवस्थापन केले. अफिफने अलीकडेच पत्रकारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इस्रायलविरुद्ध दीर्घ युद्ध लढण्यासाठी हिजबुल्लाकडे पुरेशी शस्त्रे आहेत.
अफिफची हत्या हे हिजबुल्लाच्या नेतृत्वाला संपवण्याच्या इस्रायलच्या ध्येयाच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. याआधी इस्रायलने हिजबुल्लाचा नेता हसन नसराल्लाहला ठार मारले होते, त्यानंतर लेबनॉनस्थित गटाने हाशेम सफीदीनला प्रमुख म्हणून नियुक्त केले होते.





