ऐ ‘गणपत’ येतोय रे.! टायगर श्रॉफच्या आगामी सिनेमाची तारीख आली समोर; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

मुंबई – बॉलिवूडचा रियल बागी म्हणजेच अभिनेता ‘टायगर श्रॉफ’ पुन्हा एकदा आपला जबरदस्त अॅक्शन अवतार दाखवण्यास सज्ज झाला आहे. ‘गणपत’ (tiger shroff) या आपल्या आगामी चित्रपटातून टायगर लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. टायगर सिनेसृष्टीत खासकरून अॅक्शन सीनसाठी ओळखला जातो.
‘गणपत’ एक अँक्शन थ्रीलर चित्रपट यामध्ये टायगर (tiger shroff) सोबत अभिनेत्री क्रिती सेनन (kriti sanon) मुख्य भूमीकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे ऑफिशल पोस्टर आणि टिझर टायगर श्रॉफने आपल्या इंस्ग्रामवर शेअर केले होते.
तेव्हा पासूनच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट होते. मात्र, प्रेक्षकांची उत्सुकता जास्त न ताणता चित्रपटाची रिलीज डेट शेअर करण्यात आली आहे. स्वतः टायगरने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत या बद्दल माहिती दिली आहे.
हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये जगभरात रिलीज होणार आहे. तर या सिनेमाचा ट्रेलर 27 सप्टेंबरला येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.





