KRK On Mika Singh | गायक मिका सिंगने एका मुलाखतीदरम्यान अभिनेता-चित्रपट समीक्षक कमाल आर खान अर्थात केआरके विरोधात वादग्रस्त विधान केले होते. यावर आता केआरकेने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आणि मिकावर जोरदार टीका केली. मिकाने एका मुलाखतीत सांगितले की, त्याने कपिल शर्माला केआरकेच्या घरी नेले होते, जिथे त्यांनी गोंधळ घातला होता. त्यावर केआरकेने त्याच्या व्हिडीओमध्ये म्हटले की, “मिका हा गाढव, तो अशिक्षित आणि बेशिस्त आहे, तरी स्वत:ला गायक म्हणतो. मिका म्हणाला होता की, मी त्याला दुबईत भेटलो होतो आणि त्याने माझ्याशी गैरवर्तन केलं. होय, तो दुबईत मला भेटला होता, पण त्यानंतर सतत मला कॉल करत राहिला, म्हणून मी त्याला घरी बोलावलं. मात्र, तो आला नाही. त्याच्या मॅनेजरकडून मला समजलं की, मिकाला वाटलं की मी त्याचं अपहरण करीन. या विशेष कर्तृत्व नसलेल्या माणसाचं अपहरण करून मला काय मिळणार? तो माझ्यालेखी काहीच नाही.” KRK On Mika Singh | मुंबईतील एका घटनेचा उल्लेख करत केआरके म्हणाला की, “त्याच्या सुरक्षारक्षकांनी मिका आणि कपिलला त्याच्या घरी मद्यधुंद अवस्थेत आल्यावर चापट मारली होती. मिकाने सांगितले की, तो आणि कपिल शर्मा माझ्या घरी मुंबईत आले आणि गैरवर्तन केले. खर काय आहे ते तुम्ही गुगल केलं तरी तुम्हाला समजेल. प्रत्यक्षात ते दोघेही त्या रात्री मद्यधुंद अवस्थेत होते. ते माझ्या घरी आले आणि सुरक्षारक्षकांना मला भेटण्यासाठी सांगितलं, पण त्यांनी त्यांना आत सोडले नाही. त्यांनी माझ्या घराच्या खाली फोटो काढले आणि मला भेटण्यासाठी आग्रह धरला. शेवटी सुरक्षारक्षकांना त्यांना चापट मारून बाहेर काढावं लागलं.” केआरके पुढे म्हणाला, “मी दुसऱ्या दिवशी मिकाच्या घरी जाऊन त्याला धडा शिकवला. त्याला पुन्हा असं काही करू नकोस असा इशारा दिला, आणि नंतर त्याने माफी मागितली. तो म्हणतो की, बॉलीवूड त्याला घाबरतं, पण त्याने आयुष्यात काय मिळवलं? राखी सावंतला किस करणं हा त्याचा मोठा पराक्रम आहे का?” मिका सिंग काय म्हणाला होता? मिका सिंगने एका मुलाखतीत सांगितले होते की, “हनी सिंग केआरकेमुळे खूप त्रस्त होता. आयुष्यमान खुराणा, कपिल शर्मा सुद्धा त्याच्या वागण्याने त्रस्त होते. मी हनीला म्हटले, आपण त्याला भेटू, दारू पिऊन त्याच्याशी बोलू. आम्ही त्याचाशी खूप उद्धटपणे वागलो. दुसऱ्या दिवशी केआरके म्हणाला की, आम्ही खूप गैरवर्तन केलं. मी त्याला सांगितलं, मला काही आठवत नाही कारण आम्ही दारू प्यायलो होतो,” असे मिका सिंग एका मुलाखतीत म्हणाला होता.