“तिच्या कर्माचं फळ मिळतयं”; गायक मिका सिंगचा बिपाशा बासूवर निशाणा

Mika Singh Slams Bipasha Basu | बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू सध्या सिने इंडस्ट्रीपासून दुर असल्याचे दिसत आहे. यावरून आता गायक मिका सिंगने बिपाशाला टोला लगावला आहे. ती तिच्या कर्मामुळेच घरी बसली असल्याचे मिकाने बिपाशाला म्हंटले आहे. वास्तविक, मिका सिंगसोबत करण आणि बिपाशाचा जुना वाद आहे. त्यावरून आता मिकाने पुन्हा एकदा बिपाशावर टीका केली आहे.
एका मुलाखतीत मिकाला बिपाशाला काम का मिळत नाही?, असा प्रश्न करण्यात आला. त्यावर मिका म्हणाला, “देव सगळं बघत आहे. मला करणला घेऊन सिनेमा प्रोड्युस करायचा होता. याचं बजेट जवळपास ४ कोटी होतं. बिपाशाला मी घेणार नव्हतो पण ती बळजबरी या सिनेमाचा भाग बनली. मला दुसऱ्याच अभिनेत्रीला घ्यायचं होतं. पण बिपाशा स्वत: आली. Mika Singh Slams Bipasha Basu |
लंडनमध्ये सिनेमाचं शूट होतं. ४ कोटींचं बजेट १४ कोटींवर गेलं. मला आर्थिक चिंता होती. बजेट वाढण्याचं खरं कारण सेटवर आल्यावर मला कळालं. बिपाशा अजिबातच सहकार्य करत नव्हती. तिचे नखरे पाहून मला निर्मितीमध्ये यायचा पश्चात्ताप होत होता. पती-पत्नी असूनही त्यांनी रोमॅन्टिक सीन्स द्यायलाही नकार दिला.” Mika Singh Slams Bipasha Basu |
तो पुढे म्हणाला, “यामध्ये एक किसींग सीन होता. हा कथेचाच भाग होता. पण बिपाशाने ऐनवेळी नकार दिला. ज्या अभिनेत्रींजवळ काम नाही ते नेहमीच नशिबाला दोष देतात. पण जे काम घेऊन आलेत त्या निर्मात्यांचाही आदर केला पाहिजे. आज तिला तिच्या कर्माचंच फळ मिळत आहे म्हणून घरी बसली आहे,” असा थेट हल्लाबोल मिकाने बिपाशावर केला.
दरम्यान, मिका सिंह निर्मित ‘डेंजरस’ ही वेबसीरिज २०२० मध्ये बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवरने केली होती. त्यानंतर बिपाशा कोणत्याच प्रोजेक्टमध्ये दिस ली नाही. ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा चिमुकल्या लेकीसोबतचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.
हेही वाचा:
‘आया रे तुफान…’, ‘छावा’तील गाण्याने दणाणून गेले टाइम्स स्क्वेअर, ‘हा’ जबरदस्त डान्स एकदा बघाच





