Karuna Sharma : …तर धनंजय मुंडेंच्या ‘आका’ बाहेर काढणार; करुणा शर्मांचा इशारा

Karuna Sharma : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात वांद्रे कोर्टाने दोषी ठरवत करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचे आदेश दिले. त्यानंतर करुणा शर्मा यांचा मुलगा सिशिव मुंडे याने धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहित करुणा शर्मा यांच्यावर आरोप केले. यावरून करुणा शर्मा यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी मारहाण केली. त्यांचे अनेक आका आहेत, तसेच माझ्या मुलामुलींना माझ्याविरोधात उभं करत आहेत असे गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केले आहेत.
करुणा शर्मा म्हणाल्या, मला जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिक कराडने मारहाण केली. धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून मारहाण केली असेल. माझी त्याच्यासोबत ओळख नाही. वाल्मिक कराडबद्दल बरंच काही माहीत आहे. धनंजय मुंडे यांचे बरेच वेगवेगळे आका आहेत. मात्र, आता मी तोंड उघडणार नाही. माझा घरगुती हिंसाचाराचा मुद्दा आहे. मुद्दा भरकटू नये, यावर लक्ष्य केंद्रीत करणार आहे. असं करुन श्रम यावेळी म्हणाल्या.
बापाच्या सांगण्यावरुन त्याने स्टोरी टाकली
शर्मा म्हणाल्या, धनंजय मुंडेची सवय आहे की, फुट टाका आणि राज्य करा. स्वतः तोंड उघडत नाही आणि माझ्या मुलाला उभं केलं. माझा मुलगा फ्रस्टेशनमध्ये होता. बरं वाईट आम्हाला झालं तर हा माणूस स्वतःला माफ करु शकणार आहे का? बापाच्या सांगण्यावरुन त्याने स्टोरी टाकली आहे. माझ्या मुलाला किती फोन येत होते, हे सर्वांनी बघितलं आहे, असा हल्लाबोल करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर केला.
… मी तोंड उघडणार : करुणा शर्मा
ज्या वेळी माझ्या आईचे निधन झाले तेव्हा माझ्या कुटुंबावर दबाव टाकला गेला. माझ्या बहिणीने केस टाकल्यावर माझ्यावर दबाव टाकला आणि सांगितले की, बहिणीची साथ देऊ नको म्हणून, तेव्हा मी बोलली नाही आता माझ्या मुलामुलींना माझ्याविरोधात तो उभे करत आहे. 1996 पासून काय-काय केले हे मी सर्व सांगेल. जर माझ्या मुलांचा माझ्याविरोधात वापर केला तर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे सोबत काय केले? काय कटकारस्थान रचले? मुंडे साहेबांविरोधात काय कटकारस्थान रचले गेले? किती आका आहेत? हे सगळं सांगण्यासाठी मी तोंड उघडणार आहे, असा इशारा करुणा शर्मा यांनी दिला.




