अलिशान फ्लॅटच्या विक्रीनंतर हेमा मालिनींची नवी खरेदी; शेअर केला व्हिडिओ

Hema Malini | बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईतील दोन अपार्टमेंट कोट्यवधी रुपयांना विकल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता त्यांनी आलिशान कार खरेदी केली आहे. नवीन कारची पूजा करतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये त्या स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून पोज देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी गुलाबी रंगाचा सूट परिधान केला आहे आणि त्या खूपच सुंदर दिसत आहे. हेमा मालिनी यांची ही नवीन कार एमजी एम९ आहे.
दरम्यान, कार खरेदी करण्यापूर्वी हेमा मालिनी यांनी त्यांचे दोन अपार्टमेंट विकल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यांनी हे अपार्टमेंट १२.५ कोटी रुपयांना विकले. हे अपार्टमेंट फातेमा सैदी आणि मानसी विपुल काझी यांना विकल्याची माहिती आहे. अभिनेत्रीच्या नवीन कारचे सजावटही खूप खास करण्यात आले आहे. नवीन कार खरेदी केल्याबद्दल चाहते त्यांना शुभेच्छाही देत आहेत. Hema Malini |
View this post on Instagram
हेमा मालिनी यांच्या कामाबद्दल बोलायचं तर, त्या राजकारणात सक्रिय असून सध्या भाजपच्या खासदार आहेत. त्या २०२० मध्ये ‘शिमला मिर्च’ चित्रपटात दिसल्या होत्या. यात त्यांनी रुक्मिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात राजकुमार राव आणि रकुल प्रीत सिंह यांच्याही महत्वाच्या भूमिका होत्या. Hema Malini |
हेही वाचा:





