हेमा मालिनी फोटो काढण्यासाठी आलेल्या चाहतीच्या कृतीवर संतापल्या; नेटकरी म्हणाले…

Hema Malini Viral Video | अभिनेत्री हेमा मालिनी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमाला हेमा मालिनी यांनी हजेरी लावली होती. यावेळी काही जणांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. यातील एका व्हायरल व्हिडीओत एक चाहती हेमा मालिनी यांच्यासोबत फोटो काढताना त्यांच्या पाठी हात टाकताना दिसत आहे. मात्र हेमा मालिनी त्या महिलेला विरोध करतात.
हेमा मालिनी यांनी चाहतीला दिलेल्या या वागणूकीमुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, एक महिला हेमा मालिनी यांच्या खांद्यावर हात ठेवून तिचा फोटो क्लिक करत आहे. अशा स्थितीत हेमा लगेचच महिलेचा हात खांद्यावरून काढून घेते आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही बदलतात. हेमा मालिनी यांचे महिला चाहत्यासोबतचे वागणे लोकांना आवडले नाही. यावरून काहींनी हेमा मालिनी यांच्यावर टीका केली आहे. तर काहींनी त्यांचे समर्थन केले आहे. Hema Malini Viral Video |
View this post on Instagram
एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘हेमा मालिनी यांची ही अत्यंत खराब वागणूक,’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, ‘हा दोष चाहत्यांचा आहे जे मूर्ख आणि गर्विष्ठ सेलिब्रिटींसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करतात.’ तर काहींनी त्यांचे समर्थन केले आहे. Hema Malini Viral Video |
‘हेमा मालिनी यांचं काहीच चुकलं नाही. एखाद्याच्या परवानगीशिवाय कोणीच कोणाला स्पर्श करू नये’, ‘अनोळख्या व्यक्तीने माझ्याही खांद्यावर हात ठेवला, तर मलाही ते आवडणार नाही’ अ. ‘लोकांनी त्यांच्या मर्यादेत वागलं पाहिजे. दुसऱ्यांच्या परवानगीशिवाय त्यांना स्पर्श करू नये’, असेही काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा:
बदलापूर प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं विधान; कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले, “त्या मुलींना…”





