मथुरा : वृंदावनमध्ये बांधला जाणारा श्री बांके बिहार कॉरिडॉर आहे तिथेच बांधला जाणार आहे. या कॉरिडॉरला विरोध करणाऱ्यांनी दुसरीकडे जाऊन स्थायिक व्हावे, असे प्रतिपादन मथुरा येथील भाजप खासदार हेमा मालिनी यांनी केले आहे. काही दिवसांपासून, बांकेबिहारी मंदिराचे पुजारी प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध करत आहेत.
शनिवारी, मंदिराच्या पुजा-यांनी मंदिराच्या उंबरठ्यावर एक अनोखा निषेध केला. त्यांनी मंदिराच्या उंबरठ्यावर अत्तर लावले आणि सरकारचे मन ठीक करण्यासाठी पूजा केली. मंदिराच्या पुजारींना वृंदावनाच्या स्वरूपात कोणताही बदल नको आहे आणि त्यांना भीती आहे की कॉरिडॉर बांधल्यामुळे वृंदावनची धार्मिक ओळख नष्ट होईल. यादरम्यान मंदिर मंत्रोच्चारांनी दुमदुमून गेले.
बांके बिहारी मंदिराच्या पुजाऱ्यांना वृंदावनाच्या स्वरूपात कोणताही बदल नको आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, कॉरिडॉरच्या बांधकामामुळे प्राचीन कुंज गल्ल्या आणि वृंदावनची धार्मिक ओळख नाहिशी होईल. निषेधादरम्यान, पुजाऱ्यांनी सांगितले की कॉरिडॉर आणि ट्रस्टच्या बांधकामामुळे वृंदावन कुंजच्या गल्ल्यांचे महत्त्व संपेल. तथापि, सरकारचा दावा आहे की यामुळे भाविकांची संख्या वाढेल. तसेच, यामुळे पर्यटनालाही चालना मिळेल अशी सरकारला आशा आहे.