हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी 44 वर्षांनंतर पुन्हा बांधली लग्नगाठ; पाहा PHOTOS

Hema Malini And Dharmendra| अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी 2 मे रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त त्यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात दोघांनी पुन्हा लग्न केल्याचा अंदाज या फोटोंवरुन लावण्यात येतो आहे. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी खास पद्धतीने लग्नाचा वाढदिवस साजरा केला. फोटोमध्ये दोघांच्या गळ्यात सोनचाफ्याच्या फुलांचा मोठा हार घातलेला दिसत आहे. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
75 वर्षांच्या हेमा मालिनी आणि 82 वर्षांचे धर्मेंद्र यांच्यातील प्रेम आणि सौंदर्य अजूनही कायम आहे. दोघांना एकत्र पाहून चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची पहिली 1970 साली ‘तुम हसीन मैं जवान’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती. 1980 साली दोघांनी लग्न केलं. या लग्नाला घरांच्याकडून विरोध करण्यात आला होता. प्रकाश कौरसोबत पहिलं लग्न झालेले असतांनाही त्यांनी हेमा मालिनीसोबत दुसरा संसार थाटला होता.
Photos from today at home pic.twitter.com/JWev1pemnV
— Hema Malini (@dreamgirlhema) May 2, 2024
ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला 44 वर्षे झाली आहेत. यानिमित्त अभिनेत्रीने एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे आणि तिचे पती धर्मेंद्र यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “आमच्या लग्नाचा ४४ वा वाढदिवस. या सगळ्या प्रवासात आम्हाला दोन सुंदर मुली आणि नातवंडांची साथ मिळाली. प्रेमाच्या दुनियेत आम्ही हरवून गेलो. चाहत्यांचं प्रेम असंच कायम असू देत. आयुष्यात याच्याशिवाय मी अजून काय मागणार. इतकं सुंदर गिफ्ट देण्यासाठी देवाचे मनापासून आभार”, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं होतं. सध्या त्यांचे हे फोटो पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा:





