Congress : भाजपला मदत करणे पडले महागात.! काँग्रेसच्या ७ नगरसेवकांचे केले निलंबन
भाजपला मदत केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाने बुधवारी आपल्या सात नगरसेवकांचे निलंबन केले आहे.

Congress – जालना महानगरपालिकेत नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेत भाजपला मदत केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाने बुधवारी आपल्या सात नगरसेवकांचे निलंबन केले आहे.
पक्षशिस्तीचा भंग केल्यामुळे या नगरसेवकांवर ही कारवाई करण्यात आल्याचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले, अशी माहिती पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षांनी (संघटन आणि प्रशासन) गणेश पाटील यांनी दिली आहे.
निलंबित करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये फारुख सादिक टुंडीवाले, इम्रान खान अमानुल्ला खान, फरहाना ए. रऊफ अन्सारी, सुनील अशोक बोर्डे, मयुरी दिनेश देणे, रुबिना माजिद पठाण आणि अनिल अशोक तिरुखे यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा :
Mamata Banerjee : उमेदवारी अर्ज भरताना सावधगिरी बाळगा; ममता बॅनर्जींचा उमेदवारांना सतर्कतेचा इशारा






