Chenab Bridge : उंचीही, बळही, सौंदर्यही ! वाचा ‘चिनाब’ पूलाची अद्वितीय वैशिष्ट्यं….

Chenab Bridge । पहलगाम हल्ल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. याठिकाणी त्यांनी रियासी जिल्ह्यात बांधलेल्या चिनाब पुलाचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदी तिरंगा फडकवताना दिसले. भारताच्या सीमा आणि सार्वभौमत्वाला वारंवार आव्हान देणाऱ्या चीन आणि पाकिस्तानला हा एक कडक संदेश होता.
हा पूल ‘चिनाब’ नदीवर बांधला गेला आहे. हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल मानला जातो. हा पूल उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. चिनाब पुलाची उंची 359 मीटर (सुमारे 1,178 फूट) आहे, जी आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे. हा पूल म्हणजे नवीन भारताच्या ताकदीचे आणि दृष्टिकोनाचे एक गौरवशाली प्रतीक असून, तो निसर्गाच्या कठीण परीक्षांना तोंड देण्यासाठी बांधला गेला आहे.
चिनाब पुलाची खास वैशिष्ट्ये वाचा…
मिळालेल्या माहितीनुसार, चिनाब पुलासाठी 2008 मध्ये करार करण्यात आला होता. हा चिनाब पूल जम्मूतील बक्कल आणि कौरीतून सुरू होतो आणि कटरा ते बनिहालला जोडतो. हा उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (यूएसबीआरएल) चा एक भाग आहे.
यामागचा उद्देश असा आहे की हवामान बदल आणि इतर नैसर्गिक बदलादरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवणं आहे. हा पूल तयार होण्यासाठी तब्बल 14 हजार कोटी रूपयांचा खर्च आल्याचं सांगितलं जातं.
चिनाब पूल प्रकल्पाला 2003 मध्ये मंजुरी मिळाली आणि कामाला सुरुवात झाली. अनेक अडचणींमुळे 2009 पर्यंत केवळ मूलभूत कामेच पूर्ण झाली. चिनाब हा पूल नदीपात्रापासून 1,178 फूट उंचीवर आहे. तसेच आयफेल टॉवरपेक्षा पूल 35 मीटर उंच असून या पुलाचं आयुष्य 120 वर्षे इतकं असल्याचं सांगितलं जातं.
#WATCH | J&K: Prime Minister Narendra Modi waves the Tiranga as he inaugurates Chenab bridge – the world’s highest railway arch bridge.#KashmirOnTrack
(Video: DD) pic.twitter.com/xfBnSRUQV5
— ANI (@ANI) June 6, 2025
जगातील सर्वात उंच चिनाब पुलाच्या उद्घाटनापूर्वी स्थिरता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी अनेक चाचण्या देखील करण्यात आलेल्या आहेत. 260 किमी प्रतितास वेगाच्या वार्यांना आणि अति जास्त तापमान व भूकंपासह आदी समस्यांना तोंड देण्यास हा पूल सक्षम असेल.
’द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, चिनाब, कौरी आणि बक्कलच्या दोन्ही बाजूंनी बसवलेली पुलाची कमान महाकाय केबल क्रेनच्या मदतीने तयार करण्यात आलेली आहे. जी तयार करण्यास अभियंत्यांना तीन वर्षांचा कालावधी लागला आहे.
तसेच या पुलाचा प्रत्येक भाग 63 मिलीमीटरच्या ब्लास्ट-प्रूफ स्टीलने बनवलेला आहे. त्यामुळे वादळ, भूकंप आणि उष्ण तापमान या पुलाचे काहीच नुकसान करू शकत नाही.
चिनाब पुलाबद्दल महत्त्वाच्या गोष्टी :
– 1250 कोटी रुपये खर्च
– चिनाब नदीपासून 359 मीटर उंच
– पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच, लांबी 1315 मीटर
– चिनाब रेल्वे पूल 8 रिश्टर स्केलच्या भूकंपांना तोंड देईल
– कोणत्याही उच्च तीव्रतेच्या स्फोटांना तोंड देईल
– संभाव्य दहशतवादी धोके क्यांनी पूलाची हानी होणार नाही





