rain update : महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार; समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळण्याचे आवाहन

rain update – भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, घाटमाथा, सातारा, कोल्हापूर आणि मराठवाडा व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भ विभागात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत मंगळवारी आणि बुधवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात ढगाळ वातावरण राहील. सकाळी काही ठिकाणी विजांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
मुंबईमध्ये पुढील सलग पाच दिवस समुद्राच्या लाटा मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. त्यामुळे किनारी भागांतील रहिवासी व पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे.
प्रशासन व बचाव दल सजग आहेत, पण प्रत्येकाची स्वतःची सुद्धा जबाबदारी आहे, सुरक्षित राहणे आणि सागरापासून लांब राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





