Maharashtra Weather Update| राज्यात पुन्हा धुमाकूळ पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Maharashtra Weather Update | राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र पुढील काही दिवसांत पुन्हा पाऊस धुमाकूळ घालण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून, त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे.
आज (२ सप्टेंबर) विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. मराठवाड्यातील हिंगोली नांदेडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज
बुधवारी (३ सप्टेंबर) राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण कोकणात आज ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. तर उत्तर कोकणामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो.
मुंबईत ऑरेंज ॲलर्ट
उत्तर कोकणात पालघर आणि ठाण्याला गुरुवारी ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पुढील तीनही दिवस ‘ऑरेंज ॲलर्ट’ आहे. सिंधुदुर्गामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये मात्र पावसाचा वेग कमी असेल. मुंबईत सध्या तरी ऑरेंज ॲलर्ट देण्यात आलेला नाही. Maharashtra Weather Update |
मराठवाड्यात येलो ॲलर्ट
उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मंगळवार ते गुरुवार या कालावधीत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. घाट परिसरामध्ये मात्र पावसाचा जोर अधिक असेल असा अंदाज आहे. मराठवाड्यातही पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस बरसणार असून येलो ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Maharashtra Weather Update |
हेही वाचा:
Pawan Kalyan Birthday: मार्शल आर्ट्सपासून ‘मेगा स्टार’पर्यंतचा प्रवास करणारे नेते ,अभिनेते…





