पुण्यात पावसाचा जोर कायम; खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

Heavy rain | राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात देखील रात्रभर पाऊस सुरू आहे. सोमवारी सकाळी देखील पावसाची संततधार सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. यापार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे.
आज (दि. 15) खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 10611 क्युसेक वाढवून सकाळी 10.00 वा. 14547 क्यूसेक करण्यात येत आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये आणि खबरदारी घ्यावी असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. Heavy rain |
याशिवाय सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, अशी माहिती देण्यात आली आहे. Heavy rain |
दरम्यान, पुणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असून काल सायंकाळपासून आज सकाळपर्यंत अग्निशमन दलाकडे विविध भागात १० ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. परंतु सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही.
तीन दिवस आधीच परतीचा प्रवास सुरू
नैऋत्य मौसमी पावसाचा (मान्सून) परतीचा प्रवास रविवारी (दि. 14 सप्टेंबर) पश्चिम राजस्थानमधून सुरू झाला आहे. यंदा तीन दिवस आधीच परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागात विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा एन्ट्री झाली आहे.
हेही वाचा:
‘एका महिलेपासून २५ मुले जन्माला घालणं अन् नंतर तिहेरी तलाक..’, रामभद्राचार्य यांचे वादग्रस्त विधान





