विदर्भ, खान्देशसह मराठवाड्यात उष्णतेची लाट; येत्या 5 दिवसात तापमान घटणार?

मुंबई- राज्यात निरभ्र आकाश व स्वच्छ वातावरणामुळे बहुतेक भागांत उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे बुधवारी खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगाव, विदर्भातील सर्व जिल्ह्यांत तसेच मराठवाड्यातील काही भागांत उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. त्यानंतर तापमान 2 ते 3 अंशाने घटण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व मराठवाड्यातील उर्वरित काही जिल्ह्यांत 5 दिवसांत कमाल तापमान 2 ते 3 अंशांनी घटण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.
मुंबई व कोकणात कमाल तापमान व आर्द्रतायुक्त गरम हवेमुळे उकाडा जाणवत असून ही स्थिती मंगळवारपर्यंत राहू शकते. “मोचा’ चक्रीवादळ बांगलादेश व ब्रह्मदेश सीमेवरील “कोक्सबझार’ व सीट्टवेजवळील “कॅऊकपायऊ’ शहरांदरम्यानच्या किनारपट्टीवर आदळले आहे. तेथे ताशी 160 ते 170 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. ब्रह्मदेशाच्या भूभागावर घुसून ते विरळ होत आहेत. त्यामुळे पूर्व व पूर्वोत्तर राज्यांत अतिजोरदार वादळी वारा व जोरदार पावसाचा अंदाज आहे.
प्रमुख शहरांतील तापमान
नंदुरबार 43.4
अमरावती 43
अकोला 42.8
अकोला 42.8
नांदेड 42.6
जळगाव 42
धुळे 41
बीड 40
मालेगाव 39





