माणुसकी हरपली; मृतदेहाजवळ ना तिरडी, ना खांदा देणारे चार लोकं

Updated On:

बेळगाव : देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातला आहे. रोज कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आणि यातून मृत्युमुखी होणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे. दरम्यान, या कोरोनामुळे आज समाजात कोणी सख्खा किंवा जवळचा राहिला नाही. कारण रात्री झोपेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शेजारी, नातेवाईक यांनी पाठ फिरवली. शेवटी पत्नीने हातगाडीतून आपल्या पतीचा मृतदेह एकटीने नेल्याची हृदयद्रावक घटना बेळगावच्या अथणी गावात घडली आहे.

कोरोनामुळे समाजातील माणुसकी केव्हाच मेली आहे. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी चार जण लागतात, पण कोरोनाच्या दहशतीमुळे चार लोक देखील जवळ येत नाहीयेत. अथणी येथील सदाशिव हिरट्टी या 55 वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. सदाशिव यांचे अथणी येथील रुग्णालयाच्या समोर चप्पल दुकान होते.

शुक्रवारी सकाळी सदाशिव मृत झाल्याची घटना शेजारी, नातेवाईक यांना समजली. बातमी समजताच शेजारी, नातेवाईक सदाशिव यांच्या घरी आले पण कोरोनामुळे मृत्यू झाला असेल या भीतीमुळे सगळ्यांनी दूर उभं राहूनच अंत्यदर्शन घेतले आणि निघून गेले. मात्र मृतदेह तिथेच राहिला. शेवटी सदाशिवच्या पत्नीने निर्धार केला आणि पतीचा मृतदेह कापडात गुंडाळला. मृतदेह कापडात गुंडाळून हातगाडी आणली. त्या दुःखी पत्नीने हातगाडीवर मृतदेह उचलून ठेवला. नंतर गावातील रस्त्यावरून हातगाडी घेऊन पत्नीने स्मशानात मृतदेह नेला. सगळे बघत राहिले पण एकही जण त्या पती गमावलेल्या महिलेच्या मदतीला आला नाही. शेवटी स्मशानात देखील पत्नीनेच पतीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या घटनेने पुन्हा एकदा माणुसकी, शेजारधर्म किंवा जवळची नाती या शब्दांवर विश्वास ठेवावा कि नाही हा विचार करण्यासाठी भाग पाडले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

2026-10-08 15:47:48

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी