Crime News : जुन्नरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; निष्पाप चिमुरडी ठरली वासनेची शिकार, नेमकं काय घडलं?
Crime News : शेजारी राहणाऱ्या तरुणाने मुलीला उसाच्या शेताच्या परिसरात नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नराधम एवढ्यावरच न थांबता त्याने मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली.

Crime News : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एका गावात अवघ्या ९ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून त्यानंतर तिची निघूर्णपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित तरुणाला बड्या ठोकल्या असून या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
ही धक्कादायक घटना मंगळवार १८ अॅागस्टला दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती समोर आली आहे. शेजारीच राहणाऱ्या नराधमाने हे क्रूर कृत्य केले आहे. शेजारी राहणाऱ्या तरुणाने मुलीला उसाच्या शेताच्या परिसरात नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नराधम एवढ्यावरच न थांबता त्याने मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली.
मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे मिसिंगची तक्रार नोंदवली. त्यानंतर तपासादरम्यान ही गंभीर घटना समोर आल्याने पिंपळवंडी गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षेची मागणी जोर धरू लागली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने ओळखीचा गैरफायदा घेत मुलीला शेतात नेल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. जुन्नरच्या आमदारांच्या गावातच चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. अवघ्या ९ वर्षांची चिरमुडी नराधमाच्या वासनेची शिकार झाली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी चौकशी केली असता या प्रकरणी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चौकशी केल्यानंतर सदर घटनेचा उलघडा झाला.
पोलिस अधीक्षकांनी घेतला आढावा
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल यांनी घटनास्थळी उपस्थित राहून तपासाचा आढावा घेत आहेत. विविध तपास यंत्रणा कामाला लावण्यात आल्या असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेने संपूर्ण पिंपळवंडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.





