Adkitta Official Trailer : ‘अडकित्ता’चा भावस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित! सई ताम्हणकर दिसणार हटके भूमिकेत
Adkitta Official Trailer : मानवी भावनांशी घट्ट नाते राखणारा संवेदनशील विषय या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. प्रेक्षकांना विचार करायला आणि चर्चेला प्रवृत्त करणाऱ्या या कथेत कुटुंब, जबाबदाऱ्या आणि नात्यांमधील भावनिक संघर्ष यांचा वेध घेण्यात आला आहे.

Adkitta Official Trailer : नातेसंबंध, कुटुंबातील गुंतागुंत आणि आजच्या समाजातील वास्तव यांवर भाष्य करणारा ‘अडकित्ता’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा भावस्पर्शी ट्रेलर २ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. ट्रेलर समोर आल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली असून, ११ सप्टेंबर रोजी ‘अडकित्ता’ झी फाइव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. (Adkitta Official Trailer )
आशुतोष परांडकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती मंगेश पवार अँड कंपनी आणि जॅकपॉट एंटरटेनमेंट यांनी केली आहे. सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सखी गोखले हे तीन कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. रोजच्या जीवनातील अनुभवांवर आधारित कथानकातून मानवी भावनांची खोली आणि नात्यांमधील गुंतागुंत मांडण्याचा प्रयत्न ‘अडकित्ता’मधून करण्यात आला आहे. (Adkitta Official Trailer )
मानवी भावनांशी घट्ट नाते राखणारा संवेदनशील विषय या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. प्रेक्षकांना विचार करायला आणि चर्चेला प्रवृत्त करणाऱ्या या कथेत कुटुंब, जबाबदाऱ्या आणि नात्यांमधील भावनिक संघर्ष यांचा वेध घेण्यात आला आहे. (Adkitta Official Trailer )
अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या विविधांगी भूमिकांसाठी ओळखली जाते. ‘अडकित्ता’मधील तिची व्यक्तिरेखाही वेगळी आणि आव्हानात्मक असल्याचे ट्रेलरवरून दिसून येते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाडची मुंजळा’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. त्यामुळे आता ‘अडकित्ता’मधील तिच्या व्यक्तिरेखेलाही प्रेक्षकांकडून पसंती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
काय आहे चित्रपटाची कथा? (Adkitta Official Trailer)
ट्रेलरनुसार, चित्रपटाची कथा मुलाच्या जन्मानंतर त्याच्या संगोपनाची जबाबदारी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावनिक गुंतागुंतीभोवती फिरते. आजच्या धावपळीच्या जीवनात उच्च पदावर काम करणाऱ्या पालकांना मुलाच्या संगोपनाची जबाबदारी पेलताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.
मुलाच्या संगोपनासाठी मदतीची गरज भासल्यानंतर निर्माण होणारे प्रश्न, नात्यांमधील ताणतणाव आणि भावनिक संघर्ष यांचा वेध चित्रपट घेतो. ‘जन्म देणारी आई की संगोपन करणारी?’ या प्रश्नाभोवती कथानक फिरत असल्याचा अंदाज ट्रेलरवरून येतो. त्यामुळे ‘अडकित्ता’ हा केवळ कौटुंबिक कथा नसून, आजच्या समाजातील एका महत्त्वाच्या वास्तवावर भाष्य करणारा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. ‘अडकित्ता’ ११ सप्टेंबर रोजी झी फाइव्हवर प्रदर्शित होणार आहे.





