सातारा – पालखी सोहळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

सातारा – संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 18 ते 23 जून या कालावधीत जिल्ह्यातून पाडेगाव- लोणंद, तरडगाव, फलटण, बरड व साधूबुवाचा ओढा यामार्गे मार्गक्रमण करणार आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने 666 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून विविध पथके सोहळ्यात नेमण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
पालखी सोहळयाचा सातारा जिल्ह्यातून एकूण 66 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. दि. 18 व 19 जून असे दोन दिवस लोणंद (ता. खंडाळा) येथे मुक्काम, दि. 20 जून रोजी तरडगाव (ता. फलटण), दि. 21 जून रोजी फलटण व दि. 22 जून रोजी बरड (ता. फलटण) या ठिकाणी मुक्काम असणार आहे. पाडेगाव (ता. खंडाळा) ते साधुबुवाचा ओढा (ता. फलटण) या मार्गावर एकूण 1 उपजिल्हा रुग्णालय व 4 प्राथमिक आरोग्य केंद्र येत असून त्या ठिकाणावरील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांनी दिली. सुविधा पुरवण्यासाठी एक जिल्हा आरोग्य अधिकारी, दोन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, दोन तालुका आरोग्य अधिकारी,
एक अतिरिक्त संचालक, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी प्रत्येकी एक, विस्तार अधिकारी दोन व इतर कर्मचारी 8, तालुकास्तरावरील वैद्यकीय अधिकारी 21, आरबीएसके डॉक्टर 70, समुदाय वैद्यकीय अधिकारी 110, औषध निर्माण अधिकारी 33, आरोग्य सहाय्यक पुरुष 75, आरोग्य सहाय्यिका 7, आरोग्य सेवक 153, आरोग्य सेविका 94, एसटीएस/ एसटीएलएस 17, वाहन चालक 37 व शिपाई 31 अशा 666 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांपैकी 17 आरोग्यदूतांची मार्गावर आरोग्य सेवा देण्यासाठी नियुक्ती केली आहे. पालखी मार्गावरील आरोग्य व्यवस्थापनांतर्गत वैद्यकीय संस्था- शासकीय 12 व खासगी 151 एकूण 163, आंतररुग्ण (खाटांची संख्या) शासकीय 140 व खासगी 900 एकूण 1040. उपलब्ध विविक्षीत कक्ष- प्राथमिक शाळा 61 व समाजमंदिर 11 एकूण 72 अशी व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय 24 तास नियंत्रण पथके तैनात ठेवण्यात येणार आहे, असे डॉ. शिर्के यांनी सांगितले.
आरोग्य विभागाची सोहळ्यात विविध पथके
पालखी मार्गावर खंडाळा तालुक्यात 5 व फलटण तालुक्यात 29 असे एकूण 34 शुध्दीकरण पथके पालखी मार्गावर असणार आहेत. पालखी मार्गावर खंडाळा तालुक्यात 14 व फलटण तालुक्यात 21 अशी 35 टॅंकर फिलींग पॉईट पथके तयार करण्यात आली आहेत. पालखी मार्गावरील फिरती वैद्यकीय पथके (आरोग्यदूत पाडेगाव ते बरड संपूण मार्गावर) 17 दूत. पालखी मार्गावरील वैद्यकीय पथके- खंडाळा 8 व फलटण 14, एकूण 22 पथके असणार आहेत, अशी माहिती डॉ. प्रमोद शिर्के यांनी दिली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात विविध विभागांच्यावतीने जास्तीत जास्त सुविधा देण्यात येणार आहेत. याबाबत सर्व विभागांच्या वारंवार बैठका घेऊन नियोजन करण्यात आले आहे. हा सोहळा मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साही वातावरणात साजरा होण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी
आरोग्य विभागाची सोहळ्यात विविध पथके
पालखी मार्गावर खंडाळा तालुक्यात 5 व फलटण तालुक्यात 29 असे एकूण 34 शुध्दीकरण पथके पालखी मार्गावर असणार आहेत. पालखी मार्गावर खंडाळा तालुक्यात 14 व फलटण तालुक्यात 21 अशी 35 टॅंकर फिलींग पॉईट पथके तयार करण्यात आली आहेत. पालखी मार्गावरील फिरती वैद्यकीय पथके (आरोग्यदूत पाडेगाव ते बरड संपूण मार्गावर) 17 दूत. पालखी मार्गावरील वैद्यकीय पथके- खंडाळा 8 व फलटण 14, एकूण 22 पथके असणार आहेत, अशी माहिती डॉ. प्रमोद शिर्के यांनी दिली.





