लक्ष्मीनगरमध्ये 130 नागरिकांची आरोग्य तपासणी
Updated On:

आळंदी – डाॅ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी, पुणे अंतर्गत आळंदी ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र यांच्या मार्फत विश्रांतवड परिसरात लक्ष्मीनगर, पुण्यभूमी येथे सोमवारी (दि. 20 मे) रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 130 नागरिकांची तपासणी करुन औषधोपचार सेवा देण्यात आली.
या शिबिराचे आयोजन डाॅ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे डीन डाॅ. जे. एस. भवाळकर, एचओडी पी. एस एम डाॅ. हेतल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिरात नागरिकांची जनरल, स्त्रीरोग तज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, दंततज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली. तसेच मधुमेह तपासणी व मोफत औषधोपचार सेवा पुरविण्यात आली, अशी माहिती आळंदी ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे अधीक्षक जोसेफ चेरियन यांनी दिली.






