Gautam Gambhir Statement : “एक सामना हरलो म्हणून संघ वाईट होत नाही…!” इंग्लंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर कोच गंभीर यांचं वक्तव्य
Gautam Gambhir Statement : या दारुण पराभवानंतर चहूबाजूंनी टीका होत असतानाच, भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी खेळाडूंचा बचाव करत एक मोठे विधान केले आहे.

Gautam Gambhir Statement On India Loss vs England 3rd T20I Nottingham Lowest Score : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला १२५ धावांच्या ऐतिहासिक आणि लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात २०२ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी पत्त्यांसारखी कोसळली आणि संपूर्ण संघ अवघ्या ११.४ षटकांत ७६ धावांवर ऑलआऊट झाला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताचा हा धावांच्या दृष्टीने आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. या दारुण पराभवानंतर चहूबाजूंनी टीका होत असतानाच, भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी खेळाडूंचा बचाव करत एक मोठे विधान केले आहे.
आक्रमक क्रिकेट खेळताना असे निकाल लागतात; गंभीरचा दावा –
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गौतम गंभीर म्हणाले, “हे मान्य आहे की या सामन्यात आम्ही अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करू शकलो नाही. मात्र, केवळ चार सामने खराब खेळल्यामुळे किंवा एका पराभवामुळे कोणताही संघ वाईट किंवा कमजोर होत नाही. अनेकदा समोरचा संघ तुमच्यापेक्षा जास्त सरस खेळ करतो, तर कधीकधी तुम्हाला परिस्थितीचा अचूक अंदाज लावता येत नाही. जेव्हा तुम्ही मैदानावर अधिक आक्रमक आणि जोखीम पत्करून (Risky Cricket) खेळण्याचा प्रयत्न करता, तेव्हा काही वेळा असे धक्कादायक निकालही समोर येतात.”
स्वतःमध्ये सुधारणा करण्यावर मुख्य भर –
Gautam Gambhir said, “we just haven’t played well, you don’t become a bad team after 4 games. Sometimes, if the opposition plays better than you, sometimes you don’t assess the conditions better. Reading the game is equally important as well. We haven’t done that since Ireland”. pic.twitter.com/jZVgmeNJE5
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 8, 2026
गंभीर यांनी पुढे सांगितले की, “आयर्लंड मालिकेपासून आम्हाला खेळ आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्याची गरज आहे आणि आम्ही सध्या त्याच गोष्टीवर काम करत आहोत. इंग्लंड पुढील सामन्यात काय रणनीती आखणार, यापेक्षा आमचा मुख्य भर स्वतःच्या खेळात सुधारणा करण्यावर असेल. गेल्या दोन सामन्यांत आम्ही १९० पर्यंत धावा केल्या होत्या, त्यामुळे आमचा आत्मविश्वास कमी झालेला नाही. आजचा दिवस आमचा नव्हता, इतकेच.”
अवघ्या ७६ धावांत संपूर्ण भारतीय संघ गारद –
२०२ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. अभिषेक शर्मा १० धावांवर बाद झाला, तर १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी अवघ्या ५ चेंडूंत १३ धावा करून माघारी परतला. यानंतर इशान किशनने १३ आणि कर्णधार श्रेयस अय्यरने केवळ ५ धावा केल्या. अक्षर पटेल (१०), हर्षित राणा (९), तिलक वर्मा (३) आणि शिवम दुबे (२) हे देखील अपयशी ठरले. फलंदाजांच्या या फ्लॉप शोमुळे भारताने मालिका जिंकण्याची संधी गमावली असून आता केवळ अब्रू वाचवण्यासाठी पुढील सामन्यात खेळावे लागणार आहे.





