Sanjay Dina Patil : ‘बैठकीला येणार’ म्हणाले, पण आलेच नाहीत! संजय दिना पाटलांची ती प्रतिक्रिया चर्चेत, नेमकं काय म्हणाले होते?
Sanjay Dina Patil : त्यामुळे सहा खासदारांवर नेमकी कोणती कारवाई केली जाणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.

Sanjay Dina Patil : नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नवी दिल्लीत संसदीय दलाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी पक्षातील नऊ खासदारांना व्हीप जारी करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात बैठकीला तीनच खासदारांनी उपस्थिती दर्शवल्याने उबाठाचे सहा खासदार फुटल्याच्या दाव्याला अधिक बळ मिळाले आहे. सहा खासदारांनी पक्षाचा व्हीप धुडकवल्याने खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी संतप्त प्रतिक्रिया देत थेट कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सहा खासदारांवर नेमकी कोणती कारवाई केली जाणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. (Sanjay Dina Patil)
हेही वाचा : Operation Tiger : काय झाडी? काय डोंगरनंतर आता बंडखोर 6 खासदार ‘या’ ठिकाणी असल्याची माहिती समोर…
या सगळ्या घडामोडी घडत असताना सहापैकी दोन खासदार बैठकीला उपस्थित राहतील अशी शक्यता होती. यामध्ये संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचं नाव घेतले जात होते. एका मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना खासदार संजय दिना पाटील यांनी बैठकीला जाणार असल्याची प्रतिक्रिया दिली होती, असा दावा संबंधित वाहिनीने केला होता. मात्र, संजय दिना पाटील यांनी बैठकीला दांडी मारली आहे. त्यामुळे मग त्यांनी बैठकीला जाणार असल्याचं का म्हटलं होतं आणि असं काय झालं काय ते बैठकीला हजर राहू शकले नाहीत. यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. (Sanjay Dina Patil)
संजय दिना पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती? (Sanjay Dina Patil)
काल ज्यावेळी फुटलेल्या सहा खासदारांची नावे समोर आली होती. त्यामध्ये संजय दिना पाटील यांचं देखील नाव होतं. खासदार संजय दिना पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, ज्याला जायचं ते जातील…जे जाणार ते तुम्हाला दिसतील… आम्हाला हैराण करू नका. संजय राऊत अरविंद सावंत हे आमचे नेते आहेत, ते यावर बोलतील, आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही.
हेही वाचा : Aam Aadmi Party: राघव चड्ढानंतर ‘हे’ तीन खासदार ‘आप’ला करणार रामराम? ; केंद्रीय मंत्र्यांचा खळबळजनक दावा






