Sanjay Raut : खासदार फुटीनंतरचा प्लॅन ठरला ! संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
Sanjay Raut : महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एका मोठ्या भूकंपाची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) एकूण सहा खासदार पक्षातून फुटल्याची चर्चा असून, त्यांनी आपला एक वेगळा गट स्थापन केल्याचे बोलले जात आहे.

Sanjay Raut : महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एका मोठ्या भूकंपाची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) एकूण सहा खासदार पक्षातून फुटल्याची चर्चा असून, त्यांनी आपला एक वेगळा गट स्थापन केल्याचे बोलले जात आहे.
हा गट लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात (शिवसेना) विलीन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात असून, ही संभाव्य फूट रोखण्यासाठी पक्षाचे संकटमोचक खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत.ज्यामुळे ठाकरे गट आता बंडखोरांविरोधात कोणती मोठी कायदेशीर किंवा राजकीय खेळी खेळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘निधी मिळत नाही हे केवळ बहाणे’ : संजय राऊत
विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याने आम्ही पक्ष सोडत आहोत, असा युक्तिवाद बंडखोर खासदारांकडून (Sanjay Raut) केला जाण्याची शक्यता आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी खासदारांना आरसा दाखवला. ते म्हणाले, “आम्हाला निधी मिळत नव्हता म्हणून आम्ही पक्ष सोडत आहोत, असे जर ते सांगत असतील तर ते पूर्णपणे चुकीचे आहे.
आपण जेव्हा विरोधी पक्षात असतो, तेव्हा विकासकामांसाठी सरकारी निधी मिळणार नाही, हे आधीच गृहित धरावे लागते. निधी न मिळणे हे वास्तव असले आणि निधीची गरज असली, तरी विरोधी पक्षात असताना तुम्ही हे स्वीकारले पाहिजे. त्यामुळे निधी मिळत नाही हे केवळ पक्ष सोडण्याचे बहाणे आहेत.”
बंडखोरांना माफी नाही, आम्ही धडा शिकवणार!
२०२२ मध्ये झालेल्या पक्षातील मोठ्या फुटीचा संदर्भ देत राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी अधिक आक्रमक पवित्रा घेतला. “याआधी आमच्या पक्षात फूट झाली तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. पण आता जे खासदार बाहेर पडू पाहत आहेत, ते आमच्या पक्षाच्या चिन्हावर आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर निवडून आलेले आहेत.
त्यामुळे या बंडखोरांना कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही. आम्ही आता आमच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जीवाशी खेळू देणार नाही. जे कुणी बंडखोरी करत आहेत, त्यांना आम्ही कडक धडा शिकवणार,” असा थेट इशारा राऊतांनी दिला आहे.
ठाकरे गटाकडून ‘व्हीप’ जारी
पक्षातील ही फूट कायदेशीरदृष्ट्या रोखण्यासाठी आणि बंडखोरांना कोंडीत पकडण्यासाठी ठाकरे गटाने मोठी खेळी खेळली आहे. पक्षाकडून सर्व खासदारांसाठी अधिकृत ‘व्हीप’ (पक्षाचा आदेश) जारी करण्यात आला आहे. त्यानुसार सर्वच खासदारांना आगामी प्रक्रियेत उपस्थित राहावे लागणार आहे.
जर या सहा खासदारांनी व्हीपचे उल्लंघन केले, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई संसदेत केली जाऊ शकते. त्यामुळे आता कायद्याच्या चौकटीत ठाकरे गट कोणती पावले उचलतो आणि या बंडखोर खासदारांचे (Sanjay Raut) भवितव्य काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






