Gautami Gadgil Kapoor : “त्याने पॅन्टमध्ये हात टाकला अन्….”; मराठी अभिनेत्रीने शेअर केला धक्कादायक प्रकार

Gautami Gadgil Kapoor : मराठी हिंदीसह इतर भाषिक सिनेमा इंडस्ट्रीत कलाकार त्यांच्यासोबत झालेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल बेधडकपणे बोलताना दिसत आहे. प्रत्येकाचेच अनुभव हे सुन्न करणारे आहेत. अनेक सेलिब्रिटींनी यावर भाष्य केलं आहे. मात्र, नुकत्याच एका मुलाखतीत एका मराठी अभिनेत्रीने कास्टिंग काऊचचा नाही, तर तिच्यासोबत बालपणी घडलेल्या धक्कादायक प्रकार शेअर केला आहे.
बॅालिवूडमध्ये अनेक मराठी अभिनेत्रींनी एण्ट्री करत स्वतःताची एक नवी ओळख निर्माण केली आहे. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री गौतमी गाडगीळ कपूर. नुकतीच गौतमी हिने हॉटरफ्लाय चॅनेलला मुलाखत दिली असून, या मुलाखतीत तिने आपल्या बालपणीचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. हा अनुभव सांगताना त्यावेळी आईने कसं समजावलं आणि त्या कठीण प्रसंगातून सावरण्यास कशी मदत केली हे सांगायला ती विसरली नाही.
माझ्याबरोबर काय होतंय हे मला…
मी सहावीत असताना ही घटना घडली. मी नेहमीप्रमाणे बसने शाळेतून घरी येत होते. माझ्या शेजारी बसलेल्या एका अनोळखी व्यक्तीने माझ्या पँटमध्ये हात टाकला. यामुळे मी खूप गोंधळले. मला समजलंच नाही की माझ्याबरोबर काय घडतंय. मी खूप घाबरले. मी बसमधून खाली उतरले. जवळपास 15-20 मिनिटं मी घाबरलेले होते. तो माणूस माझा पाठलाग तर करत नाहीये ना ही भीती मला वाटत होती. मी इतकी लहान होते की माझ्याबरोबर काय होतंय हे मला समजायला मला थोडा वेळ लागला.
तिने घरी आल्यावर आईला तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला त्यावेळी आईने तिला तू घाबरण्याऐवजी त्याला कानाखाली मारायला हवी होतीस, त्याची कॅालर पकडायला हवी होती, असं म्हटलं होतं





