“तो अगदी प्रभू राम यांच्याप्रमाणे सिंपल आहे…” क्रितीने केले प्रभासचे कौतुक

मुंबई – क्रिती सेनन आणि प्रभास त्यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मिडीयावर याबाबत अनेक प्रतिक्रिया पुढे येताना दिसत आहे. ट्रेलर लॉंचच्या कार्यक्रमासाठी क्रिती-प्रभाससह सनी सिंह आणि ओम राऊत यांच्यासह टीम उपस्थित होती. यावेळी सर्वांनी प्रभासाचे कौतुक केले.
आदिपुरुषच्या ट्रेलर लाँचवेळी क्रिती आणि प्रभास यांनी माध्यमांशी संवाद साधला. दोघांनीही या चित्रपटातील त्यांच्या पात्रांबद्दल सांगितले. दरम्यान, क्रितीने तिचा सहकलाकार प्रभासची चांगलीच प्रशंसा केली. यादरम्यान प्रभास श्री राम यांच्याप्रमाणे डाऊन टू अर्थ असलयाचे क्रितीने म्हंटले. आम्ही हा चित्रपट खूप प्रेम आणि भक्तीभावाने बनवला आहे, आशा आहे की तुम्हाला तो आवडेल असंही क्रितीने यावेळी म्हंटले.
क्रिती पुढे म्हणाली,”प्रभास एकदम प्रभू रामांप्रमाणे सिंपल आहे. मला सांगावेसे वाटते की तो खूप साधा आणि मनाने साफ व्यक्ती आहे. तसेच चित्रपटानंतर जानकी बाबतचे प्रेम आणि आदर आणखी वाढल्याचे देखील क्रितीने यावेळी सांगितले.
आदिपुरुषच्या स्टार कास्टबद्दल बोलायचे तर, या चित्रपटात राघवच्या भूमिकेत प्रभास, जानकीच्या भूमिकेत क्रिती सेनन आणि लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंह आहे. या पौराणिक कथेत तगडा व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. आदिपुरुषचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे, तर भूषण कुमार यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट 16 जूनला रिलीज होणार आहे.





