काजोलने शेअर केले ‘दो पत्ती’ चित्रपटाचे नवे पोस्टर

Do Patti Film | अभिनेत्री काजोल आणि क्रिती सेनॉन ‘दो पत्ती’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. कृती दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘दो पत्ती’मध्ये अभिनयासोबतच कृतीनं या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाच्या या नव्या पोस्टरमुळे प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
हा चित्रपट २५ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ‘दो पत्ती’मध्ये क्रिती दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. काजोलशिवाय नेटफ्लिक्सनेही आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “सत्य की खोट? राज की न्याय? दो पत्तीच्या गेममध्ये तुम्ही कोणत्या बाजूने आहात? 25 ऑक्टोबरला दो पत्ती पाहा, फक्त नेटफ्लिक्सवर.” Do Patti Film |
View this post on Instagram
अभिनेत्री क्रिती दोन जुळ्या बहिणींच्या भूमिकेत दिसत आहे. सौम्या, ध्रुव नावाच्या मुलावर प्रेम करते, तिची जुळी बहीण तिच्याकडून त्याला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते. यानंतर या त्रिकोणी प्रेमाचे रूपांतर क्राईम स्टोरीमध्ये होते. यात काजोलने एका पोलिस महिलेची भूमिका साकारली आहे जिला हत्येचे गूढ उकलण्याचे काम सोपवले जाते. शशांक चतुर्वेदी दिग्दर्शित हा चित्रपट 25 ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होण्यासाठी सज्ज होणार आहे. Do Patti Film |
हेही वाचा:
हरियाणाच्या मंत्रिमंडळात ‘या’ 4 महिलांचा होणार समावेश ; सावित्री जिंदाल यांना मिळेल का स्थान?





