Bhairava Anthem : बहुचर्चित कल्कि 2898 AD चित्रपटाचे पहिलं गाणं भैरवा अँथम रिलीज

साउथचा सुपरस्टार अभिनेता प्रभास याचा बिग बजेट बहुचर्चित कल्कि 2898 AD हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 27 जून रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. यानंतर आता या चित्रपटामधील भैरवा अँथम हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
भैरवा अँथम प्रदर्शित!
गेल्या काही दिवसांपासून या गाण्याची चाहत्यांना प्रतीक्षा लागली होती. आज हे गाणे प्रदर्शित झाले. या चित्रपटाचं संगीत संतोष नारायण यांनी दिलं आहे. भैरव अँथममध्ये तेलगू आणि पंजाबी भाषेचा तडका पाहायला मिळत आहे. पंजाबी गायक दिलजीत दोसांझ आणि प्रभास या गाण्यात पंजाबी लुकमध्ये दिसत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी 16 जून रोजी गाण्याचा प्रोमो व्हिडीओ रिलीज केला होता. हे गाणे हिंदी व्यतिरिक्त तेलुगू आणि तामिळ भाषेतही रिलीज करण्यात आलं आहे. भैरव अँथम गाण्याचे बोल तामिळसाठी कुमार आणि विवेक, तेलुगूसाठी रामजोगय्या शास्त्री आणि विवेक आणि हिंदीसाठी कुमार यांनी लिहिले आहेत.
चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार
या चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात असणार आहे. कल्कि 2898 AD या चित्रपटाचे बजेट 600 कोटी आहे. 27 जून रोजी हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.





