‘मुख्यमंत्री करा, असा कटोरा घेऊन ते दिल्लीत आले होते. पण …’

Uddhav thackeray । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि यूबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे नुकतेच तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर केले होते. त्यांच्या तीन दिवसांच्या भेटीदरम्यान, ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांना भेटले. लवकरच राज्यात विधानसभा होणार आहे अशात उद्धव ठाकरे हे जागावाटपा चर्चेसाठी दिल्लीला गेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे .
अशात आता उद्धव ठाकरे य दिल्ली दौऱ्यावरून महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ठाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यावरून त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
नरेश म्हस्के म्हणाले,’उद्धव ठाकरे यांचा सहकुटुंब लोटांगण दौरा पार पडला. मला मुख्यमंत्री करा, असा कटोरा घेऊन ते दिल्लीत आले होते. पण काँग्रेसने त्यांना अजिबात भाव दिला नाही. संजय राऊत यांनी स्वतःच राजकीय महत्व वाढवणं आणि उद्धव ठाकरे यांना मी कसं नाचवू शकतो हे दाखवणारा हा दौरा होता” अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली. निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी हा दौरा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत अब्जावधींचा घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधू यांची भेट घडवून आणणारा हा दौरा होता.’ असा आरोपही त्यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचं कारण सांगत त्यांनी गुप्ता बंधूंसोबत झाली डील अशी खोचक टीका केली. ‘गुप्ता बंधू काहीच महिन्यापूर्वी जामिनावर बाहेर आले होते. सरकारला मुंबईत समजेल म्हणून त्यांनी दिल्लीत भेट घेतली. 7 तारखेला संजय राऊत यांनी दुपारी ही भेट घडवून आणल्याच दिसत आहे. ही भेट कशासाठी झाली? याची सखोल चौकशी होणं गरजेच आहे. ज्या माणसाने एका देशाला फसवलं त्याची भेट का घेतली ?” असा सवाल नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. त्यांच्या घरातील CCTV बंद केले असतील, तर रस्त्यावरचे सीसीटीव्ही किंवा त्यांचे फोन तपासा. आदेश गुप्ता, राजेश गुप्ता अशी त्यांची नाव आहेत. अशा व्यक्तींची पहिली चौकशी झाली पाहिजे’ असेही नरेश म्हस्के म्हणाले.





