#HBD : जेवढी बोल्ड तितकीच सोज्वळ दिसते सई…

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री ‘सई ताम्हणकर’चा आज वाढदिवस आहे. 25 जून 1986 रोजी सांगलीत सईचा जन्म झाला.
आपल्या दिलखेच अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे ‘सई’ मराठी रसिकांच्या दिलों की धडकन बनली आहे.
मुळची सांगलीची असलेल्या सईचा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवास सोपा नव्हता. मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून सईने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेने सईने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं. ‘अनुबंध’, ‘अग्निशिखा’, ‘तुझं माझं जमेना’, ‘साथी रे’ या मालिकांमध्येही तिने काम केलं आहे.
‘सनई चौघडे’ या चित्रपटाने सईचे आयुष्य बदलले. या चित्रपटाने तिला मराठी चित्रपटसृष्टीत नाव मिळवून दिले.
सई नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.
अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे. तिने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.











