IPL 2025 Ticket Scam : IPL तिकीट घोटाळ्यात CID ची मोठी कारवाई, HCA च्या अध्यक्षासह पाच जणांना अटक

IPL 2025 Ticket Scam Case in Marathi : आयपीएल २०२५ दरम्यान हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (एचसीए) आणि सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) यांच्यात तिकिटांबाबत वाद निर्माण झाला होता. त्यावेळी हा वाद मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता, परंतु नंतर सर्वांनी मिळून तो सोडवला होता. तथापि, सीआयडी या प्रकरणाची चौकशी करत होती. आता या चौकशीत पुरावे सापडल्याने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ए. जगन मोहन राव यांना अटक करण्यात आली आहे. यासोबतच त्यांच्यावर आणखी एका प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
आयपीएल घोटाळ्यातील अटकसत्र सुरू-
सनरायझर्स हैदराबाद संघ आयपीएल २०२५ दरम्यान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आपले घरगुती सामने खेळतो. या हंगामात, या फ्रँचायझीने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनवर आरोप केले होते की, असोसिएशनचे अधिकारी मॅचच्या पासेससाठी फ्रँचायझीला त्रास देत आहेत. यानंतर तेलंगणा सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली.
Official – CID has arrested five people in a forgery and cheating case related to the Hyderabad Cricket Association (HCA).
-A. Jagan Mohan Rao, along with C. Rajender Yadav and his wife G. Kavitha, created fake documents for Sri Chakra Cricket Club by forging the signature of C.… pic.twitter.com/TwFJyCJ9XH
— Naveena (@TheNaveena) July 10, 2025
आता या चौकशीत अटकसत्र सुरू झाले आहे. यामध्ये एचसीएचे अध्यक्ष ए. जगन मोहन राव, एचसीएचे कोषाध्यक्ष जे.एस. श्रीनिवास राव, एचसीएचे सीईओ सुनील कांते, श्री चक्र क्रिकेट क्लबचे महासचिव राजेंद्र यादव आणि श्री चक्र क्रिकेट क्लबच्या अध्यक्षा जी. कविता यांचा समावेश आहे. हे अटकसत्रं मोफत सामन्याच्या तिकिटांच्या वितरणाशी संबंधित फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार आणि दबाव आणण्याच्या कृतींच्या आरोपांनंतर झाले आहे. विशेष एचसीएचे अध्यक्ष ए. जगन मोहन राव यांच्याविरुद्ध आणखी एका प्रकरणात तपास सुरू झाला आहे.
हेही वाचा – IND vs ENG : सामन्यापूर्वी खेळपट्टी पाहण्यासाठी गेलेल्या बुमराहला रोखलं, नेमकं काय घडलं? VIDEO होतोय व्हायरल
एचसीएचे अध्यक्षांविरुद्ध आणखी एका प्रकरणात तपास सुरू –
अहवालानुसार, जगन मोहन राव यांनी सी. राजेंद्र यादव आणि त्यांच्या पत्नी जी. कविता यांच्यासह मिळून गोविलुपुरा क्रिकेट क्लबचे प्रमुख सी. कृष्णा यादव यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून श्री चक्र क्रिकेट क्लबसाठी खोटे दस्तऐवज तयार केले. या खोट्या दस्तऐवजांचा उपयोग श्री चक्र क्रिकेट क्लबला गोविलुपुरा क्लब म्हणून दाखवण्यासाठी करण्यात आला, ज्यामुळे जगन मोहन राव यांची एचसीएच्या अध्यक्षपदी निवड झाली. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडून सुरू आहे.
हेही वाचा – IND vs ENG : नितीश रेड्डीचा कहर; अवघ्या चार चेंडूंत केली इंग्लंडच्या सलामीवीरांची शिकार! VIDEO व्हायरल
काय आहेत आरोप?
तेलंगाना क्रिकेट असोसिएशनचे (TCA) महासचिव धरम गुराव रेड्डी यांनी ९ जून रोजी दाखल केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण नोंदवण्यात आले. या तक्रारीच्या आधारे सीआयडीने भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कलम ४६५ (जालसाजी), ४६८ (फसवणुकीच्या उद्देशाने जालसाजी), ४७१ (बनावट दस्तऐवज खरे म्हणून वापरणे), ४०३ (मालमत्तेचा अप्रामाणिकपणे गैरवापर), ४०९ (लोकसेवकाद्वारे फौजदारी विश्वासघात), ४२० (फसवणूक), तसेच कलम ३४ (सामायिक हेतूने अनेक व्यक्तींनी केलेली कृती) यांचा समावेश आहे. आरोप आहे की, राव यांनी HCA निवडणूक लढवण्यासाठी बनावट दस्तऐवज सादर केले होते.





