मुंबई- बॉलिवूड अभिनेता ‘आयुषमाण खुराणाचा’ आज वाढदिवस आहे. आयुषमानचा जन्म 14 सप्टेंबर 1984 रोजी चंदीगड मध्ये झाला. त्याचे खरे नाव आयुषमान नव्हे तर ‘निशांत खुराणा’ असे आहे. पण तो तीन वर्षांचा असताना त्याच्या पालकांनीच त्याचे नाव बदलले. आयुषमानचे सर्व शिक्षण पंजाबमध्येच झाले. त्यानंतर त्याने रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. शुभ मंगल सावधान, बधाई हो, बरेली की बर्फी आणि आर्टिकल 15 यांसारख्या सुपरहिट आणि दर्जेदार चित्रपटांमधून आयुषमानने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे.
#HappyIndependenceDay pic.twitter.com/9MKHOqp9jP
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) August 15, 2019
त्याने ‘आर’जे म्हणून देखील काम केले आहे. छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर विकी डोनर या चित्रपटात आयुषमानला पहिला ब्रेक मिळाला. या पहिल्याच चित्रपटाने त्याला स्टार बनवले. आयुषमानचा ‘आयुषमान भव’ या नावाने एक रॉक बँड देखील आहे. आयुषमान खुराणाचे लग्न त्याची बाल मैत्रीण ‘ताहिरा कश्यपसोबत असून, अनेक वर्षांच्या अफेअरनंतर त्या दोघांनी 2008 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना वीराजवीर आणि वरुष्का अशी दोन मुलं देखील आहेत.