Helicopter Crash : मोठी दुर्घटना..! पर्यटकांचे हेलिकॉप्टर कोसळले; ३ जणांचा मृत्यू, २ गंभीर जखमी
Helicopter Crash : काउई येथील निर्जन बेटवर हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात ३ जण ठार झाले आणि २ जण जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले

Helicopter Crash : हवाई बेटावरच्या काउई येथील निर्जन बेटवर हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात ३ जण ठार झाले आणि २ जण जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह अन्य ४ प्रवासी होते. हा समुद्रकिनारा काउईच्या उत्तर किनाऱ्यावरील ना पाली कोस्टवर आहे.
या अपघातात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला असून, इतर दोघांना उपचारासाठी विल्कॉक्स मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे हेलिकॉप्टर एअरबोर्न एव्हिएशनद्वारे चालवले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. Helicopter Crash
Helicopter Crash : मोठी दुर्घटना..! पर्यटकांचे हेलिकॉप्टर कोसळले; ३ जणांचा मृत्यू, २ गंभीर जखमी
ना पाली किनाऱ्यावरील कडे, समुद्रकिनारे आणि धबधबे पाहण्यासाठी हेलिकॉप्टर टूर हा एक लोकप्रिय मार्ग आहे, तिथे हेलिकॉप्टर उपलब्ध नसल्यास फक्त ट्रेकिंग किंवा बोटीनेच पोहोचता येते.Helicopter Crash





